Good Morning Wishes: ‘या’ खास शायरी आणि मेसेजद्वारे मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग! सकाळ होईल हॅप्पी
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: ‘या’ खास शायरी आणि मेसेजद्वारे मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग! सकाळ होईल हॅप्पी

Good Morning Wishes: ‘या’ खास शायरी आणि मेसेजद्वारे मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग! सकाळ होईल हॅप्पी

Published Jul 22, 2024 05:00 AM IST

Good Morning Wishes: जर मित्र-मैत्रिणींना रोज सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज पाठवण्याचा छंद असेल, तर तुम्ही या शायरी आणि मेसेजेसपैकी कोणतीही एक त्यांना आरामात पाठवू शकता!

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi (shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: प्रत्येक दिवस एकसारखा नसतो. आयुष्यातील रोजचे दिवस कधी ते आरामात निघून जातात, तर कधी वाटेत बरेच दगड येतात. मात्र, या सगळ्या प्रवासात आपल्याला मोलाची साथ देतात ते आपले मित्र. आयुष्यात असे काही मित्र एकत्र राहिल्याने ते कठीण काळाचा आधार बनतात. रोज सकाळी उठल्यावर पहिल्यांदा आपल्याला आपल्या मित्रांची आठवण येते, हे त्यांना तुम्ही एका मेसेजमधून सांगू शकता…

 

हे सकाळ जेव्हा तू येशील तेव्हा आनंद घेऊन ये,

प्रत्येक चेहऱ्यावर हसू घेऊन ये आणि अंगणात आनंदाचा सडा घाल! 

नवीन पहाटेच्या हार्दिक शुभेच्छा!

 

सकाळी ज्या व्यक्तीची सर्वात आधी आठवण येते, 

ती व्यक्ती आयुष्यातील सर्वात खास व्यक्ती असते!

 

जी माणसं स्वत:कडे जे काही आहे त्यात खुश असतात, 

तीच माणसं इतरांचही भलं कसं करावं हेच बघत असतात.

शुभ सकाळ

 

देवाने मला काय हवे आहे असे विचारले,

मी म्हणालो- यश, आनंद, दीर्घायुष्य,

मग त्याने विचारले कोणासाठी?

मी म्हणालो, जो हा मेसेज वाचतोय त्याच्यासाठी!

गुड मॉर्निंग

 

देव कधीच कोणाचे नशीब लिहीत नाही,

आपले विचार, आपले वर्तन आणि आपली कृती

आयुष्याच्या प्रत्येक पावलावर

आपले नशीब लिहित असतात!

गुड मॉर्निंग

माणसाला संपत्तीने फक्त सुविधा मिळतात, 

पण समाधान व सुख नाही. 

सुख आणि स्वास्थ्य मिळविण्यासाठी आपसातील प्रेम, 

आणि आपल्यांची साथ असणे अत्यंत गरजेचे असते!

गुड मॉर्निंग

 

प्रत्येक 'वेळ' जीवनाप्रती दयाळू असते असे नाही,

काही 'क्षण' जगण्याचा अनुभवही शिकवतात.

गुड मॉर्निंग!

 

नात्यातील गैरसमज दूर करुन घ्या. 

भांडून घ्या. पण बोलणं कधीच बंद करू नका. 

कारण बोलणं बंद झालं, तर नातं आधीसारखं राहत नाही!

शुभ सकाळ

 

नात्यात स्वाभिमानाची बोट बुडत असेल तर,

ती नाती तोडलेलीच बरी..!!

गुड मॉर्निंग

 

ज्यांचा स्वत:वर विश्वास आहे त्यांना माहित आहे की,

आज नाही तर उद्या त्यांची स्वप्ने नक्कीच पूर्ण होतील!

शुभ प्रभात

कोण आपल्या पुढे आणि कोण मागे आहे महत्त्वाचं नाही. 

कधी कधी आपण कोणाच्या सोबत आहोत आणि कोण आपल्या सोबत आहे, 

हे पाहणे महत्त्वाचे असते.

Whats_app_banner