Good Morning Wishes In Marathi: प्रत्येक सकाळ एक नवी आशा आणि नवी संधी घेऊन येते. जर तुम्ही देखील अशा लोकांपैकी एक असाल ज्यांना सकाळी उठल्याबरोबर आपल्या मित्र आणि कुटुंबातील सदस्यांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा पाठवायला आवडतात, तर हे खास मेसेज तुमच्यासाठीच आहेत. आम्ही येथे सुंदर सुप्रभात शुभेच्छा संदेश घेऊन आलो आहोत. हे संदेश तुमच्या प्रियजनांच्या आयुष्यात मोठा बदल घडवू शकतात.
नाते कितीही वाईट असले,
तरी ते कधीही तोडू नका,
कारण पाणी कितीही घाण असले,
तरी ते तहान नाही पण आग विझवू शकते!
…
देव माझा सांगुन गेला
पोटा पुरतेच कमव,
जिवाभावाचे मित्र मात्र
खूप सारे जमव!
शुभ सकाळ
…
माणुस स्वता:च्या नजरेत चांगला पाहिजे,
लोकांच काय, लोक तर देवात पण चुका काढतात!
सुप्रभात
…
मुखी साखरेचा, गोडवा असावा,
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा,
जोडावी माणसे, जपावी नाते,
विसरून व्यवहारी, फायदे तोटे,
क्षणांचे मणी, अलगद ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे!
शुभ सकाळ
…
स्वतःसाठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे,
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर,
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही!
शुभ सकाळ
…
जे हरवले आहेत
ते शोधल्यावर परत मिळतील,
पण जे बदलले आहेत
ते मात्र कधीच शोधून मिळणार नाहीत!
शुभ सकाळ
…
देवाने प्रत्येकाच आयुष्य कसं छान पणे रंगवलंय,
आभारी आहे मी देवाचा,
कारण माझं आयुष्य रंगवताना,
देवाने तुमच्यासारख्या माणसांचा
रंग माझ्या आयुष्यात भरलाय!
शुभ सकाळ
…
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले असले,
तरीही नारळ फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय कळत नाही!
शुभ सकाळ
मानवी जीवन यशस्वी व्हायचा
तडजोड हाही एक मार्ग आहे,
माणसाने ती करायला शिकलं पाहिजे,
जिथं जिथं तडा जाईल
तिथं तिथं जोड देता आलं की,
कुठलंच नुकसान होत नाही,
तडजोड म्हणजे शरणागती नव्हे,
तर ती परिस्थितीवर केलेली मात असते!
…
नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय
आतमधील अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या
संकटावर मात केल्याशिवाय,
यशाचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश नव्हे,
तो यशाचाच एक भाग आहे!
शुभ सकाळ