Good Morning Wishes: तीच खरी तुमच्या जवळची माणसं! हक्काच्या माणसांना म्हणा गुड मॉर्निंग; पाठवा ‘हे’ मेसेज
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: तीच खरी तुमच्या जवळची माणसं! हक्काच्या माणसांना म्हणा गुड मॉर्निंग; पाठवा ‘हे’ मेसेज

Good Morning Wishes: तीच खरी तुमच्या जवळची माणसं! हक्काच्या माणसांना म्हणा गुड मॉर्निंग; पाठवा ‘हे’ मेसेज

Published Oct 08, 2024 07:38 AM IST

Good Morning Wishes In Marathi: डोळे उघडताच तुमचे मित्र,नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात, याची नक्कीच जाणीव करून द्या.

Good Morning marathi Status:
Good Morning marathi Status: (freepik)

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची गोड सुरुवात करायची असेल, तर त्यांना तुमची आठवण आवर्जून करून द्या. डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात, याची नक्कीच जाणीव करून द्या. यासाठी, सकाळी उठल्याबरोबर एक गोड सुंदर संदेश पाठवणे पुरेस आहे. डोळे उघडताच जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती त्याचा मोबाईल बघेल, तेव्हा तुमचा एक संदेश त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणेल. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. 

 

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे.

 

 

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या,

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात.

शुभ सकाळ !

 

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!

 

 

डोळयातून वाहणारं पाणी,

कोणीतरी पाहणारं असावं..

हृदयातून येणार दु:ख,

कोणीतरी जाणणारं असावं..

गुड मॉर्निंग

 

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त माणसं महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी..!

शुभ सकाळ!

 

 

उत्तर म्हणजे काय ते,

प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

जबाबदारी म्हणजे काय हे,

त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही!

शुभ सकाळ!

 

 

जो फक्त वर्षाचा विचार करतो,

तो धान्य पेरतो…

जो दहा वर्षाचा विचार करतो,

तो झाडे लावतो…

जो आयुष्यभराचा विचार करतो,

तो माणुस जोडतो…!

शुभ सकाळ!

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

सुप्रभात

 

 

स्वतासाठी सुंदर घर करणे हे

प्रत्येकाचे एक स्वप्न असते,

पण... एखाद्याच्या मनात घर करणे,

यापेक्षा सुंदर काहीच नसते…

सुप्रभात!

 

 

नाते सांभाळायचे असेल तर

चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,

आणि,नाते टिकवायचे असेल तर

नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

शुभ सकाळ!

 

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

शुभ सकाळ!

Whats_app_banner