Good Morning Wishes in Marathi: एक नवीन सुरुवात, आठवणी बनवण्याची नवी संधी आणि ज्यांची आपण काळजी घेतो त्यांना आनंद पसरवण्याची संधी नवी सकाळ देत असते. दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर संपूर्ण दिवस चांगला जातो, असं म्हटलं जातं. अर्थात जर कोणी तुम्हाला मेसेज केला तर, तो अगदी निवडक असतो. अशा वेळी तुम्ही काही निवडक मेसेजच्या माध्यमातून तुमच्या मित्र मैत्रिणींना तसेच प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देऊ शकता. येथे पाहा लेटेस्ट गुड मॉर्निंग मेसेज...
गुलाब कोठेही ठेवला तरी
सुगंध हा येणारंच
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे
कोठेही असली तरी
आठवण ही येणारंच
शुभ सकाळ
टाळ वाजे, मृदूंग वाजे,
वाजे हरीची वीणा..
माउली– तुकोबा निघाले पंढरपूरा,
मुखाने विठ्ठल विठ्ठल म्हणा…
सुप्रभात!
जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,
प्रामाणिक रहा...
जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,
साधे रहा...
शुभ सकाळ!
आनंदाने फुलवूया जीवनाचा,
सुंदर मळा...
सद्विचारांच्या रंगाने रंगवूया,
मनाचा फळा...
शुभ सकाळ!
जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा,
काहीतरी देण्यात महत्व असतं…
कारण मागितलेला स्वार्थ,
अन दिलेलं प्रेम असतं…
शुभ सकाळ!
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ,
सर्वांना शुभेच्छा..
सुख-समाधान-शांती लाभो,
हीच ईश्वर चरणी इच्छा.
सुप्रभात!
कधीही आपल्या दुःखाचा आणि सुखाचा
बाजार मांडू नका,
कारण इथे प्रत्येक जण मतलबी झालाय..
कष्टाचा आवाज
कुणाला ऐकू येत नाही
पण चमक मात्र सगळ्यांच्या
डोळ्यात खटकते.
शुभ सकाळ!
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो.
अशीच सुंदर सकाळ...
शुभ सकाळ!
प्रत्येक वेळी एकाच बाजूने विचार केला
तर समोरचा चुकीचाच दिसणार.
दोन्ही बाजूने विचार करून बघा
कधी गैरसमज होणार नाहीत.
शुभ सकाळ
सकाळ हसरी असावी,
ईश्वराची मूर्ती नजरेसमोर दिसावी,
मुखी असावे पांडूरंगाचे नाम,
सोपे होई सर्व काम!
सुप्रभात
एखादी गोष्ट बोलावी की नाही,
हे आपला संयम
आणि
संस्कार ठरवतं!
शुभ सकाळ
अश्रू असो कोणाचेही असो,
आपण विरघळून जावे...
नसो कोणीही आपले,
आपण मात्र कोणाचेही व्हावे…
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या