Good Morning Wishes In Marathi : जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मोर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात तेव्हा,
दुःख कितीही मोठे असले तरी,
त्याच्या वेदना जाणवत नाहीत!
सुंदर दिवसाच्या शुभेच्छा
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच
पण जर तुम्ही माशाची परीक्षा त्याच्या
झाडावर चढण्याच्या क्षमतेवर
करू लागलात तर तुम्ही
सर्व आयुष्य त्याला मूर्खच समजत राहाल.
शुभ सकाळ
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
शुभ सकाळ
ही सकाळ जेवढी सुंदर आहे,
तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,
जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे
त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
शुभ सकाळ
नाते कितीही वाईट असले तरी ते
कधीही तोडू नका कारण
पाणी कितीही घाण असले तरी ते
तहान नाही पण आग विझवू शकते
शुभ सकाळ
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे
शुभ सकाळ
काही गोष्टी आयुष्य
बदलून टाकतात
मिळाल्या तरीही आणि
नाही मिळाल्या तरीही!
शुभ सकाळ
मंदिरातील घंटेला आवाज नाही
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही
कवितेला चाल नाही
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुधा किंमत नाही
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही
शुभ सकाळ
दुःखाचे डोंगर कोसळले तरी
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकविले
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकविले
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकविले
आपल्यासारखी गोड माणसे भेटली
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकविले
शुभ सकाळ
क्षमा म्हणजे काय?
सुंदर उत्तर...
चुरगळल्यानंतरही फुलांच्या पाकळ्यांनी
दिलेला सुगंध म्हणजे क्षमा...!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या