Good Morning Wishes : तुमच्यासारखी गोड माणसं हृदयात रहातात... प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : तुमच्यासारखी गोड माणसं हृदयात रहातात... प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes : तुमच्यासारखी गोड माणसं हृदयात रहातात... प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Feb 02, 2025 07:57 AM IST

Good Morning Message In Marathi: अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्पा डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो.

तुमच्यासारखी गोड माणसं हृदयात रहातात... प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!
तुमच्यासारखी गोड माणसं हृदयात रहातात... प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग! (shutterstock)

Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर 'हे' मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.

हिरवी झाडे जंगलात राहतात,

सुंदर फुले बागेत रहतात,

चंद्र तारे आकाशात रहातात,

आणि

तुमच्यासारखी गोड माणसं

हृदयात रहातात...

 

 

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

उगवलेला हा दिवस आपल्याला

आनंदात्मक उत्साहवर्धक आणि

उत्तम आरोग्यदायक लाभो

शुभ सकाळ

 

 

आपण खरं बोलतो आणि स्पष्ट बोलतो

पण लोकांना आपला राग येतो,

खरंतर राग खोटं बोलणाऱ्याचा यायला पाहिजे..

पण लोकांना खोटं जास्त आवडतं

म्हणून लोकं खरं बोलणाऱ्याचा

राग करतात.

शुभ सकाळ

 

 

मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली

स्पंदने निरपेक्ष असली की,

कुठल्याही नात्याच्या धाग्यात

विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले

जातात.

शुभ सकाळ

 

रक्ताची नाती जन्माने मिळतात,

मानलेली नाती मनाने जुळतात,

पण नाती नसतानाही जी

बंधनं जुळतात,

त्या रेशमी बंधनांना

मैत्री म्हणतात

शुभ सकाळ

 

 

माणसांनी कुठूनही घसरावं पण

फक्त कोणाच्याही नजरेतून

घसरु नये

कारण मोडलेल्या हाडांवर

उपचार होऊ शकतो,

पण तुटलेल्या मनावर नाही!

शुभ सकाळ

 

 

चालताना पाऊल….

बोलताना शब्द….

बघताना दृश्य….

आणि ऐकताना वाक्य….

या चार गोष्टी काळजीपूर्वक

आपण आचरणात आणल्या तर,

जीवनात वादळ फार निर्माण

होत नाही…

शुभ सकाळ

 

 

एकदा देवाच्या पायात पडलेली फुले,

देवाच्या गळ्यातील फुलांना म्हणाली…

असे तुम्ही कोणते पुण्य केले की,

तुम्ही देवाच्या गळ्यात आहात

त्यावर हारातील फुले म्हणाली…

त्यासाठी काळजात सुई

टोचून घ्यावी लागते…

 

 

आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे,

मागे वळून पाहू शकतो पण मागे

जाता येत नाही,

म्हणून येणार्‍या प्रत्येक क्षणाचा

आनंद घेत जगा…!

शुभ सकाळ

Whats_app_banner