Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभव आणि ऊर्जा घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मक गोष्टी असण्याची शक्यता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. गुड मॉर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता. त्यासाठी त्यांना फक्त एका मेसेजसोबत गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज आहे. तुमच्या एका मेसेजने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर शुभ सकाळचे हे मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
स्वप्रं छोटं असलं तरी चालेल...
पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे...
शुभ सकाळ!
धुक्याकडून एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…
कायम टिकणारी गोष्ट एकच
ती म्हणजे स्वभाव आणि माणुसकी
शुभ सकाळ
तुम्ही तीच गोष्ट गमावता
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता अथवा चिकटून राहता!
शुभ सकाळ
काळ कसोटीचा आहे…
पण कसोटीला सांगा वारसा संघर्षाचा आहे..
शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही
शुभ सकाळ
डोळयातून वाहणारं पाणी,
कोणीतरी पाहणारं असावं..
हृदयातून येणार दु:ख,
कोणीतरी जाणणारं असावं..
शुभ सकाळ!
आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी मारा,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत
शुभ सकाळ
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
शुभ सकाळ
आपला कॉन्फिडन्स हा सुतळी
बॉम्ब सारखा असला पाहिजे
वाजला तर एकदम जोरात
नाही वाजला तरी जवळ यायची
कोणाची हिम्मत नाही झाली पाहिजे
शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ
संबंधित बातम्या