Good Morning Marathi Message: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभूती घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मकता असते. चांगली सुरुवात आपत्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. सकाळची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय म्हणावे लागेल. तुम्ही व्हॉट्स अॅपवर तुमच्या मित्रांना हे १० उत्तम विचार शेअर करू शकता.
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची
हीच खरी मैत्री मनांची.
शुभ सकाळ!
आपण खरं बोलतो आणि स्पष्ट
बोलतो पण लोकांना आपला
राग येतो, खरंतर राग खोटं
बोलणाऱ्याचा यायला पाहिजे..
पण लोकांना खोटे जास्त आवडतं
म्हणून लोकं खरं बोलणाऱ्याचा
राग करतात.
शुभ सकाळ!
जसे आहात तसेच रहा.
नेहमी लोकांच्या आवडीनुसार
बदलायचा प्रयत्न केला तर
आयुष्य कमी पडेल.
शुभ सकाळ
मनाच्या गाभाऱ्यातून उमटलेली
स्पंदने निरपेक्ष असली की,
कुठल्याही नात्याच्या धाग्यात
विश्वासाचे मणी अलगदपणे ओवले जातात.
रक्ताची नाती जन्माने मिळतात,
मानलेली नाती मनाने जुळतात,
पण नाती नसतानाही जी
बंधनं जुळतात,
त्या रेशमी बंधनांना
मैत्री म्हणतात!
शुभ सकाळ
माणसांनी कुठूनही घसरावं पण
फक्त कोणाच्याही नजरेतून
घसरु नये
कारण मोडलेल्या हाडांवर
उपचार होऊ शकतो,
पण तुटलेल्या मनावर नाही!
शुभ सकाळ
एकदा देवाच्या पायात पडलेली फुले,
देवाच्या गळ्यातील फुलांना
म्हणाली…
असे तुम्ही कोणते पुण्य केले की,
तुम्ही देवाच्या गळ्यात आहात?
त्यावर हारातील फुले म्हणाली…
त्यासाठी काळजात सुई
टोचून घ्यावी लागते…!
शुभ सकाळ
आयुष्य हे एकेरी मार्गासारख आहे
मागे वळुन पाहू शकतो पण मागे
जाता येत नाही,
म्हणून येणाऱ्या प्रत्येक क्षणाचा
आनंद घेत जगा…!
शुभ सकाळ
आयुष्याची खरी किंमत तेव्हाच
कळते जेव्हा स्वतःच्या जीवनाशी
संघर्ष करण्याची वेळ येते!
शुभ सकाळ
माणसाला परकं कोण आहे
हे कळण्यापेक्षा
आपलं कोण आहे
हे कळायला अधिक वेळ लागतो!
शुभ सकाळ
माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,
कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर,
एखाद्या वेळेस साथ देणार नाही,
पण माणुसकी, प्रेमळ स्वभाव आणि
आत्मविश्वास तुम्हाला कधीही एकटं पडू देणार नाही!
विश्वास…
हा किती छोटा शब्द आहे
वाचायला सेकंद लागतो
विचार करायला मिनिट लागतो
समजायला दिवस लागतो आणि
सिद्ध करायला संपूर्ण आयुष्य
लागते.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या