Good Morning Wishes and Messages In Marathi: प्रत्येक दिवसाची पहाट म्हणजे माणूस नव्या लढाईसाठी सज्ज होतो. ही स्थिती जाणून आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी आणि जवळच्या लोकांसाठी प्रेरणा म्हणून काम करता येते. तुमच्या मित्र मैत्रिण किंवा एखाद्या खास व्यक्तीला मनापासून प्रेरित करून पुढे जाताना पाहायचे असेल तर सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा संदेश त्यांना पाठवता येते. एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासोबतच त्यांच्या दिवसाला मोटिव्हेट करायचं असेल तर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे गुड मॉर्निंग मॅसेज त्यांना पाठवा.
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलंय, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलंय.
पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते.
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
येणारी प्रत्येक सकाळ इतकी रम्य असावी,
तुझी चिंता काळजी सर्व काही दूर पळून जावी,
येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाचा असावा,
तुझ्या खूश असण्याचा सर्वांनाच हेवा वाटावा!
शुभ सकाळ
योग्य व्यक्तीचे हात हातात असतील तर,
आयुष्यात चुकीच्या माणसांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही!
शुभ सकाळ
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही,
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही!
शुभ सकाळ
खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे,
आपली माणसं आपल्याच माणसांचा
कधीच पराभव करत नाहीत!
शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके आणि
परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला हे ओळखता आले
तर आयुष्यात प्रत्येक दिवस चांगलाच असणार!
शुभ सकाळ
आरसा आणि ह्रदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच…
आरशात सगळे दिसतात आणि
ह्रदयात फक्त आपलेच दिसतात!
शुभ सकाळ
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ!
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते,
उन्हात फिरताना सावलीची गरज असते,
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते,
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ!