Good Morning Wishes : जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं…; प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं…; प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes : जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं…; प्रियजनांना खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग

Nov 12, 2024 07:42 AM IST

Good Morning Wishes In Marathi : सकाळ आणखी खास बनवायची असेल, तर‘हे’ गुड मॉर्निंग शुभेच्छा पाठवा आणि आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा.

Funny Good Morning
Funny Good Morning (Shutterstock)

Good Morning Wishes In Marathi : सकाळची सुरुवात करताना गुड मॉर्निंग म्हणण्यासाठी फक्त दोन शब्द पुरेसे नसतात, विशेषत: जेव्हा आपल्या आयुष्यात काही महत्त्वाच्या व्यक्ती असतात. प्रत्येक सकाळ ही खूप खास असते. ही खास सकाळ आणखी खास बनवायची असेल, तर ‘हे’ गुड मॉर्निंग शुभेच्छा पाठवा आणि आपल्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू फुलवा. ‘हे’ खास गुड मॉर्निंग मेसेज आपलाच नव्हे तर, आपल्या प्रियजनांचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात.

 

प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,

चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…

आपण जरी भेटत नसू दररोज,

पण आपले चांगले विचार नेहमी

नक्की भेटत राहतील एकमेकांना…

माझी माणसं हिच माझी श्रीमंती…

लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,

अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…

जगण्यासाठी लागतात फक्त प्रेमाची माणसं

अगदी तुमच्यासारखी…!!

 

 

आपल्यात लपलेले परके आणि 

परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला हे ओळखता आले तर, 

आयुष्यात प्रत्येक दिवस चांगलाच असणार! 

शुभ सकाळ

 

 

आरसा आणि ह्रदय

दोन्ही तसे नाजूक असतात

फरक एवढाच…

आरशात सगळे दिसतात आणि ह्रदयात फक्त आपलेच दिसतात 

शुभ सकाळ

 

 

जी माणसं दुसऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करतात, 

ईश्वर त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद कधीच कमी होऊ देत नाही… 

शुभ सकाळ

 

 

प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा 

आपण उघडू शकतो.

फक्त आपल्याजवळ कृतज्ञतेची 

किल्ली असावी लागते! 

शुभ सकाळ

 

 

सुख म्हणजे नक्की काय असतं, 

कालच्या दिवसाची खंत नसणं आणि 

आजचा दिवस चिंता नसणं!

शुभ सकाळ

 

जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे

आपल्याजवळ असतात,

तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी,

त्याच्या वेदना जाणवत नाहीत.

शुभ सकाळ!

 

 

समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असून,

ते अंतःकरणाची संपत्ती आहे..

ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.

शुभ सकाळ!

 

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील.

शुभ सकाळ!

 

किती दिवसाचे आयुष्य असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून कारण

या जगात उद्या काय होईल

ते कोणालाच माहित नसते..

म्हणुन आनंदी रहा.

 

समाजात जो सरळ व सत्याने वागतो

त्याला नेहमीच अन्यायाचे घाव सोसावे लागतात.

कारण… जंगलात लहान मोठी, वाकडी तिकडी

अशी अनेक प्रकारची झाडे वाढलेली असतात.

परंतु अशी झाडे कोणीच तोडत नाही.

पण, जी सरळ वाढलेली असतात,

त्यांना मात्र कुऱ्हाडीचे घाव सोसावे लागतात.

शुभ सकाळ!

Whats_app_banner