Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मोर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.
जगातलं कटु सत्य हे आहे की,
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून
दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती
जपण्यातच खरा आनंद आहे.
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
आपली काळजी करणाऱ्या
माणसाला गमावू नका..
एखाद्या दिवशी जागे व्हाल
तेव्हा कळेल की,
तारे मोजण्याच्या नादात चंद्रच गमावला..
शुभ सकाळ!
मुखी साखरेचा, गोडवा असावा
मनी कुणाचा, कधी द्वेष नसावा
जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून व्यवहारी, फायदे तोटे
क्षणांचे मणी, अलगद ओवावे
आनंदी सुरांनी, मनास छेडावे!
शुभ सकाळ
नम्रपणा हा गुण सर्व गुणांपेक्षा
जास्त किंमती व मौल्यवान आहे,
तो ज्याच्याकडे आहे,
त्याच्याभोवती कितीही बलाढ्य स्पर्धक असले,
तरी तो आयुष्यात नक्कीच यशस्वी होतो
शुभ सकाळ
मंदिरातील घंटेला आवाज नाही,
जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही,
कवितेला चाल नाही,
जोपर्यंत तुम्ही ती गात नाही,
त्याच प्रमाणे तुमच्या भावनांना सुद्धा किंमत नाही,
जो पर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही!
शुभ सकाळ
दुःखाचे डोंगर कोसळले तरी,
आयुष्याने पुन्हा सावरायला शिकवले,
सुखाचे पडणारे हळुवार चांदणे,
आयुष्याने पुन्हा पाहायला शिकवले,
फुलाच्या वाटेवरचा प्रीतीचा गंध,
आयुष्याने पुन्हा घ्यायला शिकवले,
आपल्यासारखी गोड माणसे भेटली,
आणि आयुष्याने पुन्हा जगायला शिकवले!
शुभ सकाळ
स्वतः साठी वेळ द्या, कारण
आपण आहोत तर जग आहे..
आणि अतिशय महत्वाचे,
दुसऱ्यासाठी वेळ द्या
कारण ते नसतील तर
आपल्या असण्याला काहीच अर्थ नाही!
शुभ सकाळ
चिखलात पाय फसले, तर नळा जवळ जावे,
परंतु नळाला पाहून, चिखलात जावू नये,
तसेच जीवनात वाईट परिस्थिती आली,
तर पैशांचा उपयोग करावा,
परंतु पैसा बघून वाईट मार्गावर जावू नये!
छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही,
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते, कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात,
पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत:असतो!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या