Good Morning Wishes : जिथे विचार जुळतात तिथेच, खरी मैत्री होते... खास अंदाजात मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : जिथे विचार जुळतात तिथेच, खरी मैत्री होते... खास अंदाजात मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes : जिथे विचार जुळतात तिथेच, खरी मैत्री होते... खास अंदाजात मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग!

Jan 30, 2025 07:00 AM IST

Good Morning Wishes In Marathi: जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते.

जिथे विचार जुळतात तिथेच, खरी मैत्री होते... खास अंदाजात मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग!
जिथे विचार जुळतात तिथेच, खरी मैत्री होते... खास अंदाजात मित्रांना म्हणा गुड मॉर्निंग! (Shutterstock )

Good Morning Marathi Message: कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणाऱ्या सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता देता येते. तुम्हालाही रोजचा दिवस इतरांसाठी खास बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

वयाचं काहीच देणंघेणं नसतं.

जिथे विचार जुळतात तिथेच,

खरी मैत्री होते...!

 

 

मैत्री म्हणजे सुंदर पहाट,

कधीही न हरवणारी दोस्तीची वाट,

मैत्री म्हणजे हवेतला ऊबदार गारवा,

अन् जणू दरवळणारा मारवा,

मैत्री म्हणजे अत्तराची ईवलीशी कुपी,

दु:खावरची हळुवार जादूची झप्पी.

गुड मॉर्निंग

 

 

मैत्री ही नेहमी गोड असावी ,

जीवनात तिला कशाची तोड नसावी ,

सुखात ती हसावी, दु:खात ती रडावी,

पण आयुष्यभर मैत्री सोबत असावी.

शुभ सकाळ

 

 

मैत्रीला रंग नाही, तरीही ती रंगीत आहे,

मैत्रीला चेहरा नाही, तरीही ती सुंदर आहे,

मैत्रीला घर नाही, म्हणूनच ती

माझ्या आणि तुझ्या हृदयात आहे…

शुभ सकाळ

 

 

बहरू दे आपल मैत्रीच नातं

ओथंबलेले मन होऊ दे रितं

अशीच असुदे तुझ्या मैत्रीची साथ

घट्ट पकड माझ्या मैत्रीचा हात.

शुभ सकाळ

 

 

जीवनाच्या प्रत्येक वळणावर आठवण येत राहील,

एकत्र नसलो तरी सुगंध दरवळत राहील,

कितीही दूर गेलो तरी मैत्रीचे हे नाते,

आज आहे तसेच उद्या राहील.

गुड मॉर्निंग

 

जिथे बोलण्यासाठी शब्दांची गरज नसते,

आनंद दाखवायला हास्याची गरज नसते,

दु:ख दाखवायला आसवांची गरज नसते,

न बोलताच ज्यामध्ये सारे समजते,

ती म्हणजे मैत्री असते…

शुभ सकाळ

 

 

सागराचे पाणी कधी आटणार नाही,

मनाची आठवण कधी मिटणार नाही ,

एक जन्म काय हजार जन्म झाले तरी,

तुझी आणि माझी मैत्री कधीच तुटणार नाही.

गुड मॉर्निंग

 

 

कितीही दुःख असलं तरी आयुष्य

नेहमी हसत हसत जगावं… कारण

एक छोटीशी स्माईल सुद्धा खूप काही

करण्याचं बळ देते…

 

 

माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात,

एक म्हणजे वाचलेली पुस्तकं,

आणि दुसरी भेटलेली माणसं!

शुभ सकाळ

 

 

आयुष्यात पैशाने कमवलेल्या

वस्तू पेक्षा स्वभावाने कमावलेली

माणसं आणि नाती जास्त आनंद देतात!

शुभ सकाळ

Whats_app_banner