Good Morning Wishes In Marathi: दररोज सकाळी आपण एक नवीन सुरुवात करतो. आपला दिवस कसा जाणार आहे, हे आपल्या पहिल्या विचारांवर अवलंबून असते. एक सकारात्मक विचार आपल्याला संपूर्ण दिवसासाठी ऊर्जावान बनवू शकतो. गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्याच्या माध्यमातून आपण स्वतःला आणि आपल्या प्रियजनांना प्रेरित करू शकतो आणि जीवनात सकारात्मक बदल घडवून आणू शकतो. सुप्रभात! या शब्दांमध्ये किती सकारात्मक ऊर्जा दडलेली असते. एक छोटसा संदेश, पण आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी मोठा प्रेरणादायी ठरतो. आपण दररोज ज्या व्यक्तीला भेटतो त्यांना एक सुंदर शुभेच्छा देऊन आपण त्यांचा दिवस उजळवू शकतो.
आयुष्याचा खरा आनंद भावनेच्या ओलाव्यात असतो,
कुठलचं नातं ठरवून जोडता येत नाही,
ते आपोआप जोडलं जातं,
खरी आपुलकी, माया ही फार दुर्मिळ असते,
हे दान ज्याला लाभतं, त्यालाच त्यातला खरा आनंद मिळवता येतो!
शुभ प्रभात
--------------------------
कडू गोळी चावली नाही गिळली जाते,
तसेच जीवनात अपमान, अपयश, धोका
यांसारख्या कटू गोष्टी सरळ गिळाव्यात,
त्याला चावत बसू नयेत,
त्याला चावत बसाल, आठवत राहाल,
तर जीवन आणखी कडू होईल!
शुभ सकाळ
--------------------------
भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्यकाळाची काळजी सोडली की,
वर्तमानातला आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान वाटू लागतो!
--------------------------
नातं किती वर्षाचं आहे त्यापेक्षा,
तुमच्या त्यात किती भावना गुंतलेल्या आहेत,
हे जास्त महत्वाचं असतं!
शुभ सकाळ
--------------------------
नाती आणि बर्फाचा गोळा बनवणं एक सारखंच असतं,
ज्यांना बनवणं सोपं, पण टिकवणं खूप अवघड असतं.
दोघांना वाचवण्यासाठी फक्त एकच उपाय,
कायम थंड ठेवण्याचा प्रयत्न करा!
शुभ सकाळ
--------------------------
चांगले लोक आणि चांगले विचार,
आपल्या बरोबर असतील तर,
जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाही.
शून्यलाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे राहण्याची असते गरज!
शुभ सकाळ
--------------------------
एक कोटी रुपयाचा हिरा अंधारात हरवला,
त्याला शोधण्यासाठी पाच रुपयाची मेणबत्ती उपयोगी आली,
एखाद्या गोष्टीचे महत्व त्याच्या किंमतीवर नसते,
तर त्याच्या योग्य वेळी येणाऱ्या उपयोगावर असते!
शुभ सकाळ
--------------------------
चांगल्या वेळेपेक्षा चांगली माणसं महत्वाची असतात,
कारण चांगल्या माणसांमुळे चांगली वेळ येऊ शकते,
चांगल्या वेळेमुळे चांगली माणसं भेटतीलच असे नाही!
--------------------------
नात्यांना मधुर आवाजाची
अणि सुंदर चेहऱ्याची गरज नसते,
गरज असते ती फक्त,
सुंदर मनाची अणि अतुट विश्वासाची!
गुड मॉर्निंग