Good Morning Wishes In Marathi : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या
असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत,
ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
शुभ सकाळ
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच,
पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या,
झाडावर चढण्याच्या क्षमतेवर
करू लागलात तर तुम्ही,
सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.
शुभ सकाळ
अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात,
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…
आपला दिवस शुभ असो!
शुभ सकाळ!
मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..
शुभ सकाळ!
तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,
जी तुमच्या आवाजावरून तुमच्या
सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..
शुभ सकाळ !
स्वतासाठी सुंदर घर करणे हे
प्रत्येकाचे एक स्वप्न असते,
पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,
यापेक्षा सुंदर काहीच नसते…
सुप्रभात!
माणसाला जिंकायचे ते केवळ
आपुलकीने, कारण वेळ, पैसा, सत्ता आणि शरीर
एखादे वेळेस साथ देणार नाही,
पण माणुसकी प्रेमळ स्वभाव
आणि आत्मविश्वास कधीही
तुम्हाला एकटे पडू देणार नाही.
शुभ सकाळ
नाती अशी असावी ज्यावर अभिमान असावा,
काल जेवढा विश्वास होता तेवढाच आज असावा,
नातं फक्त ते नाही जे दुःख आणि सुखात सोबत करतं,
नातं ते असतं जे आपलेपणाची जाणीव करून देतं.
शुभ सकाळ
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर
सगळीच स्वप्न पूर्ण होत नसतात
ती फक्त पहायची असतात…
कधी कधी त्यात रंग भरायचे असतात…
पण स्वप्न पूर्ण झालं नाही तर दुखी व्हायचं नसतं..
रंग उडाले म्हणुन चित्र फाडायचं नसतं,
फक्त लक्षात ठेवायच असतं,
सर्वच काही आपलं नसतं.
शुभ सकाळ!