Good Morning Wishes: 'हसता खेळता घालवूया दिवसाचा प्रत्येक क्षण’; ‘हे’ मेसेज पाठवून जवळच्या व्यक्तीला म्हणा गुड मॉर्निंग!-good morning wishes in marathi say good morning to a loved one by sending this message ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: 'हसता खेळता घालवूया दिवसाचा प्रत्येक क्षण’; ‘हे’ मेसेज पाठवून जवळच्या व्यक्तीला म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes: 'हसता खेळता घालवूया दिवसाचा प्रत्येक क्षण’; ‘हे’ मेसेज पाठवून जवळच्या व्यक्तीला म्हणा गुड मॉर्निंग!

Aug 14, 2024 05:50 AM IST

Good Morning Wishes In Marathi:डोळे उघडताच जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती त्याचा मोबाईल बघेल, तेव्हा तुमचा एक संदेश त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणेल.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची गोड सुरुवात करायची असेल, तर त्यांना तुमची आठवण आवर्जून करून द्या. डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात, याची नक्कीच जाणीव करून द्या. यासाठी, सकाळी उठल्याबरोबर एक गोड सुंदर संदेश पाठवणे पुरेस आहे. डोळे उघडताच जेव्हा तुमचा जवळचा व्यक्ती त्याचा मोबाईल बघेल, तेव्हा तुमचा एक संदेश त्यांच्या चेहऱ्यावर एक गोड हसू आणेल. त्यामुळे त्यांचा संपूर्ण दिवस आनंदात आणि उत्साहात जाईल. 

 

हसता-खेळता घालवुया दिवसाचा,

प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,

प्रसन्न मन..

शुभ सकाळ!

 

------------------------------

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!

 

------------------------------

 

यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर

दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य.

कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.

तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.

सुप्रभात!

 

------------------------------

 

मनातून येणा-या आठवणी,

कोणीतरी समजणारं असावं..

जीवनात सुख:दुखात साथ देणारं,

एक सुंदर नातं असावं..

शुभ सकाळ!

 

------------------------------

 

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

शुभ सकाळ!

 

------------------------------

 

छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.'

गुड मॉर्निंग!

 

------------------------------

 

आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलंच मिळेल.

शुभ सकाळ.

 

------------------------------

 

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

 

------------------------------

 

थंडी क्षणाची गारवा कायमचा,

ओळख क्षणाची पण आपुलकी कायमची,

भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची,

सहवास क्षणाची पण ओढ कायमची,

हीच खरी नाती माणुसकीची!

सुप्रभात!

 

------------------------------

 

चूक ही आयुष्याच पान आहे,

माफी ही त्या आयुष्याच पुस्तक आहे.

गरज पडली, तर चुकीचं पान फाडून टाका,

पण एका पानासाठी संपूर्ण पुस्तक गमावू नका.

गुड मॉर्निंग!

विभाग