Good Morning Wishes : जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका... खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका... खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes : जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका... खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Jan 21, 2025 07:29 AM IST

Good Morning Wishes In Marathi : बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका... खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!
जो जीव लावतो त्याची साथ कधीच सोडू नका... खास अंदाजात म्हणा गुड मॉर्निंग!

Good Morning Wishes for Positive Energy: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश मिळतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

जो टाळतो त्याला कधीच कवटाळु नका..

आणि जो जीव लावतो

त्याची साथ कधीच सोडू नका..!

 

 

ज्याने आयुष्यात

पावलोपावली संघर्षाची झळ

सोसलिये तीच व्यक्ती इतरांना

आनंद देऊ शकते…

कारण.., आनंदाची किंमत

त्याच्याएवढी कोणालाच

ठाऊक नसते….

!! शुभ सकाळ !!

 

 

काळ कसोटीचा आहे

पण

कसोटीला सांगा वारसा

संघर्षाचा आहे..

स्वतःची व कुटुंबाची

काळजी घ्या…

शुभ सकाळ

 

 

आनंद हा एक भास आहे.

ज्याच्या शोधात आज प्रत्येकजण

आहे..

दुःख हा एक अनुभव आहे.

जो प्रत्येकाकडे आहे…

तरीही अशा जीवनात तोच जिंकतो,

ज्याचा स्वः वर पूर्ण विश्वास आहे…

!! शुभ सकाळ ||

 

 

आयुष्यात आनंदी क्षणासाठी

पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,

स्वभावाने कमावलेली माणसं

जास्त सुख देतात…

शुभ सकाळ

 

पानगळीने अंगणात पडलेल्या

पाना कडून गोड स्मितहास्य …

शुभ सकाळ

निसर्गाची किमया पहा

नेहेमी हसतमुख रहा

 

 

अनुभव हा

वय वाढल्याने येत नाही

तर त्यासाठी परिस्थितीचा

सामना करावा लागतो

शुभ सकाळ

 

 

येतांना….

काही आणायचं नसतं

जातांना काही न्यायचं

नसतं…

मग हे आयुष्य तरी

कुणासाठी जगायचं

असतं…

या प्रश्नाचे उत्तर

शोधण्यासाठी

जन्माला यायचं असतं

सुप्रभात

 

 

आनंद….

वाटणाऱ्या ओंजळी

कधीच रिकाम्या राहत नाहीत

कारणं त्यांना

पुन्हा भरण्याचे वरदान

परमेश्वराकडुन लाभलेलं असतं

सुप्रभात….

 

 

सुंदर दिवसाच्या आनंदी शुभेच्छा !

चमत्कार अगदी शेवटच्या क्षणीही

होऊ शकतो

मग संकट कितीही मोठे असू द्या..

फक्त आपण आपले प्रयत्न आणि

विश्वास कायम ठेवा ,आयुष्यात

चांगली माणसं नकळत मिळतात

तोडणं हा क्षणाचा खेळ असतो,

पण जोडणं हा

आयुष्याचा मेळ असतो….

शुभ सकाळ

 

 

मला श्रीमंत होण्याची

गरज नाही..

मला पाहून तुमच्या

चेहऱ्यावर

येणारी गोड स्माईल हीच

माझी श्रीमंती!

Whats_app_banner