Good Morning Wishes : लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही! 'हे' मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही! 'हे' मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes : लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही! 'हे' मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग

Jan 20, 2025 07:25 AM IST

Good Morning Wishes In Marathi : आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही! 'हे' मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग
लोक नेहमी सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात, लोखंडाच्या नाही! 'हे' मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग (shutterstock)

Good Morning Wishes for Positive Energy : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश मिळतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

फुलाला वाढायला ज्याप्रकारे

सूर्य किरणांची आवश्यकता असते,

तसेच मनुष्याला प्रगतीसाठी

चांगल्या विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर

कोणी शंका घेत असेल तर,

मुळीच कमीपणा वाटू देवू नका.

कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही.

 

 

जो टाळतो त्याला कधीच

कवटाळु नका..

आणि जो जीव लावतो

त्याची साथ कधीच सोडू नका..!

शुभ सकाळ

 

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला

मैत्री किंवा नात

करायला आवडत नाही

आम्हाला फ़क्त “माणसे” महत्वाची आहे..

ती पण तुमच्या सारखी

सुप्रभात

 

 

लहानपणापासून सवय आहे जे

आवडेल ते जपून ठेवायचं मग

ती वस्तु असो वा तुमच्यासारखी

गोड माणसं..

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात.

शुभ सकाळ

 

स्वत:साठी सुंदर घर करण्याचं

स्वप्न तर सगळेच पाहतात.

परंतु एखाद्याच्या मनात घर करणं

यासारखी दुसरी सुंदर गोष्ट नाही.

सुप्रभात

सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा…!

 

 

आयुष्य खूप लहान आहे

जगून घ्या,

प्रेम मिळणं खूप दुर्मिळ आहे

ते मिळवा,

राग खूप वाईट आहे

तो सोडून द्या,

आणि सुरवाने आपली सकाळ

आनंदित करा….

शुभ सकाळ

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा..!

 

 

काळजातले भाव हे नजरेने

बघुन कळत नसतात,

भावनांचे बंध हे नेहमीच

जुळत नसतात,

मिळतात येथे माणसे लाखोनी,

हजारोंनी,

पण तुमच्यासारखी माणसे

रोजरोज मिळत नसतात.

त्यासाठी

फक्त योग असावे लागतात.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा…

शुभ सकाळ

 

 

जन्माला येताना सगळी नाती

मिळतात,

पण मैत्रीचे रेशीम बंध स्वतःच

जोडावे लागतात.

हिरे सगळे असले तरी, कोहिनूर

एकच असतो.

म्हणूनच नाती सगळी असली तरी

मैत्रीत जीव गुंततो

सुप्रभात

 

 

प्रत्येक फुल देवघरात वाहिलं

जात नाही.

तसं प्रत्येक नात ही मनात जपलं

जात नाही.

मोजकीच फुलं असतात

देवाचरणी शोभणारी.

तशी मोजकीच माणसं

असतात…

क्षणोक्षणी आठवणारी

जसे तुम्ही

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

Whats_app_banner