Good Morning Wishes: स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे! ‘हे’ मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे! ‘हे’ मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes: स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे! ‘हे’ मेसेज पाठवून म्हणा गुड मॉर्निंग

Nov 14, 2024 07:40 AM IST

Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो.

Good Morning
Good Morning (Shutterstock)

Good Morning Wishes In Marathi:  वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वीही आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियाजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे’ मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.

 

स्वप्नं छोटं असलं तरी चालेल, 

पण स्वप्न पाहणाऱ्याचं मन मोठं असलं पाहिजे.

शुभ सकाळ

 

धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही,

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

 

 

किती दिवसाचे आयुष्य असते?

आजचे अस्तित्व उद्या नसते,

मग जगावे ते हसून-खेळून कारण

या जगात उद्या काय होईल,

ते कोणालाच माहित नसते!

म्हणुन आनंदी रहा.

शुभ सकाळ!

 

 

वेळ, मित्र आणि नाती

ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,

त्यांना किंमतीचे लेबल नसते.

पण ह्या हरवल्या की समजते,

त्यांची किंमत किती मोठी असते.

शुभ सकाळ

 

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा

ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची

भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची

सहवास क्षणांचा पण ओढ कायमची

हीच खरी मैत्री मनांची.

शुभ सकाळ

 

 

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते..

तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर

कोणी शंका घेत असेल तर

मुळीच कमीपणा वाटू देवू नका.

कारण लोक नेहमी

सोन्याच्या शुध्दतेवरच शंका घेतात,

लोखंडाच्या नाही.

शुभ सकाळ

 

 

लोक म्हणतात तू नेहमी

आनंदी असतो….?

मी म्हणालो दुसऱ्याच सुख

बघून मी जळत नाही

आणि माझं दुःख कुणाला

सांगत नाही.

शुभ सकाळ

 

 

जो डोळयातील भाव ओळखून

शब्दातील भावना समजतो

तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.

शुभ सकाळ

 

 

चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि

चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..

मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.

शुभ सकाळ!

Whats_app_banner