Good Morning Wishes In Marathi : जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.
तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात,
तर दुर्बळ बनाल,
आणि सामर्थ्यशाली समजलात
तर सामर्थ्यशाली बनाल.
दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा.
तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील
एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
शुभ सकाळ
कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास ह्या
असफलता नावाच्या बिमारीवरील दोन औषधे आहेत,
ह्या तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.
शुभ सकाळ
प्रत्येकात काही विशेष गुण असतातच,
पण जर तुम्ही माश्याची परीक्षा त्याच्या,
झाडावर चढण्याच्या क्षमतेवर
करू लागलात तर तुम्ही,
सर्व आयुष्य त्याला मुर्खच समजत राहाल.
शुभ सकाळ
सारी शक्ती तुमच्या आत दडलेली आहे.
तुम्ही काहीही आणि सारे काही करू शकता.
शुभ सकाळ
जर एखाद्यास आनंदी करण्याची
संधी मिळाली तर सोडू नका,
देवदूत असतात ती माणसं
जे दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.
मंगलमय दिवसाच्या शुभेच्छा!
हसत राहिलात तर सर्व जग तुमच्यासोबत आहे,
नाहीतर तुमच्या डोळ्यातील अश्रूंनापण डोळ्यामध्ये जागा नाही!
शुभ सकाळ
एकच आस, एक विसावा
तुझा मेसेज रोज दिसावा
परमेश्वराकडे हिच प्रार्थना
तुझा सहवास कायम मिळावा
शुभ सकाळ
मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो,
कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो,
जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो,
कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो.
शुभ सकाळ
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही!
शुभ सकाळ
खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे
आपली माणसं आपल्याच माणसांचा कधीच पराभव करत नाहीत!
शुभ सकाळ