Good Morning Wishes : धावपळीच्या जीवनात प्रियजणांना सकाळी हटके अंदाजात बोला गुड मॉर्नींग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : धावपळीच्या जीवनात प्रियजणांना सकाळी हटके अंदाजात बोला गुड मॉर्नींग

Good Morning Wishes : धावपळीच्या जीवनात प्रियजणांना सकाळी हटके अंदाजात बोला गुड मॉर्नींग

Nov 04, 2024 08:15 AM IST

Good Morning Wishes In Marathi : दररोज उठल्या उठल्या पहिले आपण मोबाईल हातात घेतो, तेव्हा या धावपळीच्या जीवनात हेच एक माध्यम आहे जे आपल्या प्रियजणांसोबत आपला संवाद घडवून आणतो. सकाळी सकाळी आपल्या प्रियजणांना हटके अंदाजात बोला गुड मॉर्नींग.

गुड मॉर्नींग शुभेच्छा
गुड मॉर्नींग शुभेच्छा (freepik)

आपली सकाळ सुंदर आणि सकारात्मक व्हावी असे प्रत्येकाला वाटते. पूर्वी यासाठी सकाळी उठल्यावर दैनंदीन कार्य आटोपल्यावर स्नान करून आपले पूर्वज पूजा पाठ करत असत. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी नवनवीन आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

जेव्हा कोणी प्रेमाने शुभ सकाळ म्हणतो तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. पण सध्या धावपळीच्या जीवनात नोकरीवर जावे लागते आणि त्यामुळे घाईगडबडीत आपण कामावरच निघतो. परंतू उठल्यावर आधी आपण मोबाईलच हातात घेतो, तेव्हा मोबाईल हाती घेऊन आपल्या प्रियजणांना हटके अंदाजात बोला गुड मॉर्नींग.

धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

दिवा कधीच बोलत नाही

त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो

त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका

चांगले कर्म करत रहा

तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.

सुप्रभात

वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ

निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…

आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात

गणपती दर्शनाने करूया…

शुभ सकाळ !

छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.

गुड मॉर्नींग

आयुष्य खूप लहान आहे

प्रेमाने गोड बोलत रहा

धन-दौलत कोण कोणाला देत नसत

फक्त माणुसकी जपत रहा

प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा

तुम्ही हाक द्या मी प्रेमाने साथ देईन.

स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.

शुभ सकाळ

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

गुड मॉर्नींग

या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.

शुभ सकाळ!

Whats_app_banner