Good Morning Wishes : प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते! 'या' मेसेजमधून म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते! 'या' मेसेजमधून म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes : प्रगतीसाठी चांगल्या विचारांची आवश्यकता असते! 'या' मेसेजमधून म्हणा गुड मॉर्निंग

Dec 24, 2024 07:26 AM IST

Good Morning Wishes In Marathi : आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता.

Good Morning Wishes In Marathi
Good Morning Wishes In Marathi

Good Morning Wishes In Marathi : तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता. पाहा ‘हे’ खास मेसेज...

फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य

किरणांची आवश्यकता असते तसेच

मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या

विचारांची आवश्यकता असते!

 

 

आपल्यात लपलेले परके

आणि परक्यात लपलेले आपले

जर तुम्हाला ओळखते आले तर,

आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ

आपल्यावर कधीच येणार नाही

शुभ सकाळ

 

 

धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,

एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…

शुभ सकाळ

 

 

सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो..

पण सत्य कधीच हरत नाही

शुभ सकाळ

 

मन आणि छत्री यांचा उपयोग तेव्हांच होतो

जेव्हा ते उघडले जातात..

नाहीतर ते ओझे कायम बाळगावे लागते

शुभ सकाळ

 

 

५ सेकंदाच्या छोट्याश्या हसण्याने

जर आपला फोटोग्राफ छान येत असेल,

तर जरा विचार करून पहा

नेहमी हसत राहिल्यावर आपले आयुष्य किती सुंदर दिसेल

शुभ सकाळ

 

 

नाती तयार होतात

हेच खूप आहे,

सर्व आनंदी आहेत

हेच खूप आहे,

दर वेळी प्रत्येकाची

सोबत होईल असं नाही,

एकमेकांची आठवण

काढत आहोत हेच खूप आहे.

सुप्रभात

 

 

नातं… म्हणजे काय…

ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.

आणि

कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…

असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नातं.

शुभ सकाळ

 

ठाम राहायला शिकावं,

निर्णय चुकला तरी हरकत नाही.

स्वतःवर विश्वास असला की,

जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.

 

 

सुखासाठी जे काही कराल

त्यात आनंद मिळेलच असे नाही

परंतु आनंदाने जे काही कराल

त्यात सुख नक्की मिळेल.

सुखाची अपेक्षा असेल…

तर दुःख ही भोगावे लागेल…

प्रश्न विचारावयाचे असतील

तर उत्तर हि द्यावे लागेल…

हिशोब भावनांचा अन वेदनांचा कधीच

लावता येत नाही जगात…

जीवनात यश हवे असेल…

तर संकटांना सामोरे जावेच लागेल.

शुभ सकाळ

 

 

शुभ सकाळ म्हणजे केवळ

शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,

दिवसाच्या सुरुवातीच्या  पहिल्या मिनिटाला मी तुमची

काढलेली “आठवण” आहे.

शुभ सकाळ

Whats_app_banner