Good Morning Wishes : दिवसाची सुरुवात गोड आणि हसरी करण्यासाठी या शुभेच्छांचा होईल उपयोग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : दिवसाची सुरुवात गोड आणि हसरी करण्यासाठी या शुभेच्छांचा होईल उपयोग

Good Morning Wishes : दिवसाची सुरुवात गोड आणि हसरी करण्यासाठी या शुभेच्छांचा होईल उपयोग

Nov 19, 2024 10:29 AM IST

Marathi Good Morning Messages : प्रत्येकाला वाटतं आपला दिवस आनंदात जाओ, दिवसाची सुरवात गोड आणि हसरी होओ, सकारात्मक होओ. यासाठी आपल्या प्रियजणांना काही खास संदेश पाठवू शकतात. हे खास संदेश तुम्हाला उपयोगी येतील. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

गुड मॉर्नींग शुभेच्छा संदेश
गुड मॉर्नींग शुभेच्छा संदेश (shutterstock)

प्रत्येक जण आपली सकाळ सकारात्मक, गोड आणि हसरी करण्यासाठी दिवसाची सुरवात देवाच्या नामस्मरणाने करतो. सकाळी स्नानादी कार्य आटोपून सुंदर भक्तीमय संगीत ऐकले जाते. देवपूजा केली जाते. आजचा दिवस सुख-संपत्ती समाधानाचा जाओ अशी देवाजवळ प्रार्थना केली जाते. परंतू, घाईगडबडीच्या जीवनात काहींची कामावर जाण्याची गडबड असते, देवासमोर नतमस्तक व्हायला वेळ मिळत नाही.

जीवनात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतरच आपण आपले ध्येय गाठू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यातील या चढउतारांना सामोरे जाताना कधीही हार मानू नये. ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येक क्षणी प्रेरित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तरच, आपल्याला आपल्या मार्गावर राहण्याचे बळ मिळते. 

तेव्हा आपली आणि आपल्या प्रियजणांची सकाळ शुभ, सकारात्मक, हसरी आणि गोड करण्यासाठी खास संदेश पाठवू शकतात. हे गुड मॉर्नींग शुभेच्छा मेसेज तुम्हाला उपयोगी येतील. वाचा, स्टेटस ठेवा आणि पाठवा.

गुड मॉर्नींग शुभेच्छा संदेश

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ,

निर्विघ्न कुरू मे देव सर्व कार्येशू सर्वदा…

कराग्रे वसते लक्ष्मीः करमध्ये सरस्वती।

करमूले तु गोविन्दः प्रभाते करदर्शनम् ।।

सुप्रभात

सरस्वती माता तुमच्या जीवनात

ज्ञान, किरण, संगीत,

सुख-शांति, समृद्धि, धन-संपत्ति,

आणि प्रसन्नता घेऊन येओ हीच प्रार्थना,

शुभ सकाळ

सर्व मंगल मांगल्ये,

शिवे सर्वार्थ साधिके,

शरण्ये त्र्यम्बके गौरी,

नारायणी नमोस्तुते…

क्षण …. जगायचे असतात,

अनुभवायचे असतात,

जपायचे असतात

शुभ सकाळ

...

गरुडा सारखे उंच उडायचे असेल तर,

कावळ्याची संगत सोडावी लागते

शुभ सकाळ

...

दगडात एक कमतरता आहे कि

तो कधी वितळत नाही,

पण एक चांगलेपणा आहे कि

तो कधी बदलत नाही

शुभ सकाळ

...

हार मानण्यापेक्षा

पुन्हा प्रयत्न करणे चांगले,

शुभ सकाळ

...

आयुष्य हे चित्रासारखे आहे, 

मनासारखे रंग भरले

की फुला सारखे खुलून दिसतात.

सुप्रभात

सुगंध हा फक्त फुलांनाच नसतो ,

तुमच्या सारख्या प्रेमळ माणसांच्या शब्दांना पण असतो .

शुभ सकाळ

या जगात सर्वात सुंदर काय ? तर मी म्हणेन,

माणसाचं माणसाशी असलेलं माणुसकीचं नातं…

गुड मॉर्नींग

मोगरा कुठे ही ठेवला तरी सुगंध हा येणारच ,

आणि आपली माणस किती ही लांब असली

तरी आठवण ही येणारच…

शुभ सकाळ

Whats_app_banner