Positive Good Morning Messages: एक चांगला संदेश आपल्या दिवसाची सर्वोत्तम सुरुवात करू शकतो. तुमच्या आठवड्याची सुरुवात आनंदी आणि सकारात्मक पद्धतीने करण्यासाठी आम्ही येथे काही निवडक गुड मॉर्निंग संदेश घेऊन आलो आहोत. हे मेसेज तुम्ही तुमच्या मित्र आणि कुटूंबियांना पाठवू शकता. तसेच आपल्या फेसबुक स्टेटस किंवा व्हॉट्सअॅप स्टेटसवरही टाकू शकता. येथे वाचा बेस्ट गुड मॉर्निंग मेसेज
उगवेल हा सूर्य आज फक्त तुमच्यासाठी
साऱ्या मनीच्या तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी
अशी सुंदर सकाळ रोजच जीवनात यावी
तुमच्या प्रसन्न चित्ताने ती खुलुन यावी
आजचा हा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो
शुभ प्रभात!
जेव्हा मायेची आणि प्रेमाची माणसे
आपल्याजवळ असतात
तेव्हा दुःख कितीही मोठे असले तरी
त्याच्या वेदना जाणवत नाहीत
गुड मॉर्निंग!
आपल्या सावलीपासून आपणच शिकावे
कधी लहान तर कधी मोठे होऊन जगावे
शेवटी काय घेवून जाणार आहोत सोबत
म्हणून प्रत्येक नाते मनापासून जपावे
शुभ सकाळ
ज्याच्याजवळ स्वच्छ मन आणि निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते,
त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणत्याही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही
गुड मॉर्निंग
कितीही दुःख असलं तरी
आयुष्य नेहमी हसत जगावं
कारण एक छोटीशी स्माईल
खूप काही करण्याचं बळ देते...
शुभ सकाळ
तुलना आणि ईर्षा करण्यात आपला किंमती वेळ वाया घालवू नका,
कारण आयुष्यात आपण जसे कोणाच्या पुढे असतो तसेच कोणाच्या तरी मागेही असतो...
गुड मॉर्निंग
मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनाची
खोल नाती जुळतात
शुभ सकाळ
सूर्य बोलत नाही त्याचा प्रकाश परिचय देतो
तसेच तुम्ही स्वतःबद्दल काही बोलू नका
चांगली कामे करत राहा
तेच तुमचा परिचय देतील
गुड मॉर्निंग
संबंधित बातम्या