Good Morning Wishes: आठवड्याचा कोणताही वार असो, एक मेसेज पाठवा आणि सगळ्यांचाच दिवस आनंदमय करा!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: आठवड्याचा कोणताही वार असो, एक मेसेज पाठवा आणि सगळ्यांचाच दिवस आनंदमय करा!

Good Morning Wishes: आठवड्याचा कोणताही वार असो, एक मेसेज पाठवा आणि सगळ्यांचाच दिवस आनंदमय करा!

Published Jul 17, 2024 09:58 PM IST

Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो.

आठवड्याचा कोणताही वार असो, एक मेसेज पाठवा आणि सगळ्यांचाच दिवस आनंदमय करा!
आठवड्याचा कोणताही वार असो, एक मेसेज पाठवा आणि सगळ्यांचाच दिवस आनंदमय करा!

Good Morning Wishes In Marathi: सोमवार असो किंवा मंगळवार दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वीही आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियाजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे’ मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.

 

जे दुसर्‍यांना अंधारात ठेवून आपलं घर सजवतात,

एक दिवस तोच अंधार त्यांचा प्रकाश हिरावून घेतो!

गुड मॉर्निंग

 

जबाबदारीची जाणीव असणारी माणसे

फारशी वाद-विवाद किंवा सवाल जवाबाच्या फंदात पडत नाहीत,

तर, समोरील काम अत्यंत महत्त्वाचे समजून उत्कृष्टतेसाठी सतत झिजत असतात!

म्हणूनच झिजणारे खांदे हे बोलणाऱ्या ओठांपेक्षा नेहमीच श्रेष्ठ असतात!

सुप्रभात

 

सुख माणसाच्या अहंकाराची परीक्षा घेते,

तर, दुःख माणसाच्या धैर्याची परीक्षा घेते,

दोन्ही परीक्षांमध्ये जो उत्तीर्ण होतो,

तोच माणूस जीवनात नेहमी यशस्वी होतो!

शुभ सकाळ

 

मालमत्तेचे वारस खूप सारे असू शकतात,

पण आपल्या कर्माचे वारस दुसरे कोणी नसून फक्त आपणच!

शुभ प्रभात

प्रेमाने जोडलेली चार माणसं व

त्यासाठी लागणारे दोन गोड शब्द

हे वैभव ज्याच्याजवळ आहे,

तोच या जगात खरा ‘श्रीमंत’ आहे!

शुभ सकाळ

 

प्रकृतीने माणसासमोर अगदी शेवटच्या क्षणापर्यंत दोनच मार्ग ठेवले आहेत.

एक तर देऊन जा, नाहीतर सोडून जा!

कारण सोबत घेऊन जाण्याची कोणतीही व्यवस्था निसर्गाने करून ठेवलेली नाही!

सुप्रभात

 

वाढत्या वयापेक्षा वाढत्या अपेक्षा माणसाला जास्त थकवतात,

सुख आपल्या हातात नाही पण सुखाने जगणे मात्र नक्कीच आपल्या हातात आहे!

शुभ सकाळ

 

समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसेल,

तर स्वतःला सांगा की, हा माणूस माणसात नाही!

इथे वेळ वाया घालवायचा नाही.!

शुभ सकाळ

 

कळत नकळत कधी जुळतात नाती ...

सुवास यांचा असा जशी पावसातील माती ...

ऋणानुबंध म्हणावे की रेशीमगाठी ...

कुणी नाही कुणाचे तरीही जगतो एकमेकांसाठी!

शुभ सकाळ

Whats_app_banner