Good Morning Wishes In Marathi: मित्र परिवाराचा दिवस खास बनवण्यासाठी तुम्ही त्यांना रोज गुड मॉर्निंग मेसेज पाठवता का? तुमचं उत्तर हो असेल, तर या शायरी तुम्हाला नक्कीच मदत करू शकतात. त्या वाचून त्यांना स्वतःला खूप खास वाटेल आणि त्या बदल्यात ते तुम्हालाही खूप शुभेच्छा देतील. त्यामुळे आता फार उशीर करू नका आणि हे गुड मॉर्निंग मेसेज मित्रांना नक्की पाठवा.
नवीन दिवस, नवीन सुरुवात,
नवीन उमेदी.
आजचा दिवस तुमच्यासाठी
खूप खास असणार आहे!
हसून पाहावं, रडून पाहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं
आपण हजर नसतानाही
आपलं नाव कुणीतरी काढावं
प्रेम माणसावर करावं की
माणूसकीवर करावं
पण, प्रेम मनापासून करावं.
सुंदर सकाळ
सकाळच्या वेळी एकच इच्छा असावी,
आपली नाती ह्या वाऱ्यासारखी असावी,
जरी दिसत नसली तरी त्यात मायेची उब असावी,
शब्दातही वर्णता नाही येणार एवढी त्यात आपुलकी असावी,
कितीही असले गैरसमज तरीही शेवटपर्यंत ती नव्यासारखीच टिकावी,
आणि विश्वासाची साथ सदैव आपल्या नात्यात असावी.
शुभ सकाळ
संधी येत नसते,
आपण ती आपल्या कार्यातुन निर्माण करायची असते.
नाव नाही झालं तरी चालेल पण काम असं करा की
लोकांनी आपल नाव काढलं पाहिजे.
शुभ सकाळ
प्रत्येक वस्तू ची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
कारण
वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात खूप
महाग विकला जातो.
शुभ सकाळ
दोन वस्तू अशा आहेत की
त्या दिल्याने कुणाचे काही नुकसान होत नाही
एक हास्य आणि दुसरे आशिर्वाद.
शुभ सकाळ
सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो,
पण सत्य कधीच हरत नाही
संघर्ष करत असताना कधिच घाबरायच नाही,
कारण माणूस त्या काळात एकटाच असतो,
यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते.
शुभ सकाळ
थंडी क्षणाची, गारवा कायमचा
ओळख क्षणाची, पण आपुलकी कायमची
भेट क्षणाची पण नाती आयुष्यभरची
सहवास क्षणाची, पण ओढ कायमची
हीच खरी नाती माणूसकीची…
सकाळच्या सुंदर शुभेच्छा
आयुष्यात लोक काय म्हणतील
याचा विचार कधीच करू नका..
कारण
आपले आयुष्य आपल्याला जगायचं आहे.
लोकांना नाही…
तुम्ही तीच गोष्ट गमावता
ज्या गोष्टीला तुम्ही अधिक बिलगता
अथवा चिकटून राहता
शुभ सकाळ
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या