Romantic Good Morning Shayari Messages: प्रेमाने ओथंबून भरलेल्या चारोळ्या आणि शायरी तुमचं मन व भावना समोरच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खूप महत्त्वाचं काम करतात. तुम्ही तुमच्या जोडीदारावर खूप प्रेम करत असाल आणि तुमच्या भावना शब्दांच्या धाग्यात बांधून सकाळीच तुमच्या पार्टनरपर्यंत पोहोचवू इच्छित असाल, तर हे रोमँटिक गुड मॉर्निंग मेसेज खास तुमच्यासाठी... आपल्या पार्टनरला पाठवा आणि त्यांची सकाळ आनंदमय करा.
तुला दिलेले वचन नक्कीच पाळेन,
सूर्याची किरणं बनून तुझ्या आयुष्यात येईन,
आपण एकत्र आहोत तर दुरावा कसला,
दररोज तुझी सकाळ फुलांनी सजवेन!
शुभ सकाळ
वारे जर हवामानाची दिशा बदलू शकतात,
तर प्रार्थना आयुष्यातील वाईट क्षणही बदलू शकतात!
गुड मॉर्निंग
सूर्याला ताऱ्यांच्या पलंगावरून उठवले,
चंद्राला रात्रीचा पाहुणा बनवले,
कोणी तरी वाट पाहतंय माझ्या संदेशाची
या थंड वाऱ्यांनी मला नुकतेच सांगितले!
शुभ सकाळ
आठवणींच्या भोवऱ्यात आपला एक क्षण असावा,
बहरलेल्या बगीच्यात एक गुलाब आमचा असावा,
आणि जेव्हा तुम्ही आपल्या प्रियजनांची आठवण काढाल,
तेव्हा त्या आठवणीत आमच्याही नावाचा उल्लेख असावा!
गुड मॉर्निंग
मी आयुष्यभर केवळ प्रवासीच होतो,
तुझ्या शोधात किती प्रवास केला हे विचारूच नकोस!
गुड मॉर्निंग
आयुष्यातील दु:खद क्षण आठवू नका,
वादळातही आपलं अस्तित्व गमावू नका,
तुम्ही कोणाच्या तरी आयुष्यातील सुख आहात,
फक्त हा विचार स्वत:च्या मनात करा!
गुड मॉर्निंग
खरे प्रेम हे तुरुंगातील कैद्यासारखे असते.
वय गेले तरी कधीच पूर्ण होत नाही!
शुभ सकाळ
तू कितीही रागावला असशील माझ्यावर,
पण, तरीही माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर...
गुड मॉर्निंग
दवांचे थेंब फुले भिजवत आहेत,
थंड लाटा शरीरात ताजेपणा जागवत आहेत,
ये आणि त्यात सामील हो,
एक सुंदर सकाळ आपलं स्वागत करत आहे!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या