Marathi Good Morning Wishes: जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची सुरुवात करायची असेल, तर त्यांना तुमची आठवण करून द्या. तुमचे डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात याची जाणीव करून द्या. यासाठी, सकाळी लवकर पाठवलेला एक प्रेमळ संदेश पुरेसा असेल. जेव्हा ते आपला अलार्म बंद करण्यासाठी किंवा वेळ तपासण्यासाठी मोबाईल हातो घेतील, तेव्हा तुमचा संदेश त्याच्या नोटिफिकेशनमध्ये नक्की दिसेल. तुमचे नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. मग, जेव्हा ते हा संदेश वाचण्यासाठी मेसेज वाचतील तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच सुंदर हसू येईल.
तुमची सकाळ आनंददायी जावो,
भूतकाळातील सर्व दु:ख जुनी होवो,
हा दिवस तुम्हाला खूप आनंद देवो,
आनंदही तुमच्या हसण्याने वेडा होवो.
-----------------------------
विचारांचा बदल झाल्यावरही नवीन दिवस उगवतो,
फक्त सूर्याच्या किरणांमुळे पहाट होत नाही!
शुभ सकाळ
-----------------------------
तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते,
जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल,
तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी!
शुभ सकाळ
-----------------------------
आनंदी राहण्याचा सुंदर उपाय
आशा देवाकडे ठेवा,
सर्वांकडे नाही!
शुभ सकाळ
-----------------------------
धावपळीच्या या जीवनात
कोण कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही!
शुभ सकाळ
-----------------------------
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही, असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
-----------------------------
कोणतंही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं,
पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते.
मृत्यूपेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाती तर सर्वच जोडतात,
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शुभ सकाळ
-----------------------------
आपुलकी असेल तर जीवन सुंदर,
फुले असतील तर बाग सुंदर,
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल,
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर!
शुभ सकाळ