Good Morning Wishes for Positive Energy: जेव्हा कोणी प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणतं तेव्हा दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये एक नवी ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी प्रेमळ आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला सर्वोत्तम संदेश मिळतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.
तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा
मनात कुणाच्या, कधी राग नसावा
आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे
सुख क्षणांचे मणी, हळुवार प्रेमाने ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.
क्षमा म्हणजे काय” ??
सुंदर उत्तर……-
चुरगळल्यानंतरही फुलांच्या
पाकळयांनी दिलेला
सुगंध म्हणजे
क्षमा….!
शुभ सकाळ
जिथे दान देण्याची सवय असते,
तिथे संपत्तीची कमी नसते आणि
जिथे माणुसकीची शिकवण असते,
तिथे माणसांची कमी नसते.
डोक शांत असलं की सहसा निर्णय चुकत नाहीत,
व भाषा गोड असली की माणसं तुटत नाहीत.
सुप्रभात!
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…
शुभ सकाळ
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
शुभ सकाळ
लाखो क्षण अपूर्ण पडतात,
आयुष्याला दिशा देण्यासाठी
आपली एक चूक कारणीभूत ठरते
ते दिशाहीन करण्यासाठी,
किती कष्ट घ्यावे लागतात,
यशाचं शिखर चढण्यासाठी,
क्षणभर गर्व कारणीभूत ठरतो,
वरून खाली पडण्यासाठी
शुभ सकाळ
आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा
नेहमी लोकांचा सलाम असतो.
शुभ दिवस
हसून पाहावं, रडून पाहावं
जीवनाकडे नेहमी डोळे भरुन पाहावं
आपण हजर नसतानाही
आपलं नाव कुणीतरी काढावं
प्रेम माणसावर करावं की
माणूसकीवर करावं
पण, प्रेम मनापासून करावं.
सुंदर सकाळ
प्रत्येक वस्तूची किंमत
वेळ आल्यावरच समजते,
कारण
वातावरणात फुकट मिळणारा
ऑक्सिजन दवाखान्यात खूप
महाग विकला जातो.
शुभ सकाळ
संबंधित बातम्या