Good Morning Wishes : आनंदी विचाराने करूया दिवसाची सुरुवात, सगळ्यांना प्रेमाने म्हणूया शुभ सकाळ!
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : आनंदी विचाराने करूया दिवसाची सुरुवात, सगळ्यांना प्रेमाने म्हणूया शुभ सकाळ!

Good Morning Wishes : आनंदी विचाराने करूया दिवसाची सुरुवात, सगळ्यांना प्रेमाने म्हणूया शुभ सकाळ!

Published Feb 06, 2025 07:43 AM IST

Good Morning Wishes In Marathi: सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो.

आनंदी विचाराने करूया दिवसाची सुरुवात, सगळ्यांना प्रेमाने म्हणूया शुभ सकाळ!
आनंदी विचाराने करूया दिवसाची सुरुवात, सगळ्यांना प्रेमाने म्हणूया शुभ सकाळ!

Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात एखाद्या आनंदी विचाराने करायची असेल, ज्यामुळे तुमचा संपूर्ण दिवस उत्कटतेने आणि उत्साहाने भरून जाईल, तर हे सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेज तुमच्यासाठी कामी येऊ शकतात. सकाळी आपल्या प्रियजनांना पाठवलेला सकारात्मक विचार केवळ आपल्या जीवनातच नाही, तर आपल्या प्रियजनांच्या जीवनात देखील मोठा बदल घडवून आणू शकतो. चला तर मग, आयुष्यातील या नव्या बदलाची सुरुवात या सुंदर गुड मोर्निंग मेसेजेस, कोट्स आणि शायरी मेसेजेसने करूया.

ही सकाळ जेवढी सुंदर आहे,

तेवढेच सुंदर तुमचे क्षण असो,

जेवढे सुख आज तुमच्या जवळ आहे

त्याच्या दुप्पट सुख उद्या तुमच्याजवळ असो…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

 

 

कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,

फुलांच्या हळुवार सुगंधानी

आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,

ही सकाळ आपल स्वागत करत आहे.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

प्रॉब्लेम्स हे येतंच राहणार,

त्यांची सवय करून,

त्यांना टक्कर देणे महत्वाचं आहे..

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं,

थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,

उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,

तुमची किंमत तेव्हाच होईल,

जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

चांगली भूमिका चांगली ध्येय

आणि चांगले विचार असणारे

लोक नेहमी आठवणीत राहतात…

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

कठोर परिश्रम आणि आत्मविश्वास

ही असफलता नावाच्या बिमारीवरील

दोन औषधे आहेत,

जी तुम्हाला एक सफल व्यक्ती बनवतात.

सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा

शुभ सकाळ

 

 

जेव्हा अडचणीत असाल तेव्हा,

प्रामाणिक रहा..

जेव्हा आर्थिक परिस्थिती चांगली असेल तेव्हा,

साधे रहा..

शुभ सकाळ

 

 

सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,

निसर्ग बदलला की फुले सुकून जातात,

मनापासून आठवण काढली आहे तुमची,

पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.

 

 

हळवी असतात मने,

जी शब्दांनी मोडली जातात..

अन् शब्दच असतात जादूगार,

ज्यांनी माणसे जोडली जातात...

शुभ सकाळ

Harshada Bhirvandekar

TwittereMail

हर्षदा भिरवंडेकर हिंदुस्तान टाइम्स - मराठीमध्ये सीनिअर कन्टेन्ट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. हर्षदाने मुंबईच्या साठे महाविद्यालयातून पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून मनोरंजन विश्वातील घडामोडींबद्दल विशेष आवड आहे. हर्षदाने यापूर्वी झी मराठी दिशा, मुंबई तरुण भारत, टीव्ही ९-मराठी, एबीपी माझा वेबसाइटमध्ये काम केले आहे.

Whats_app_banner