Good Morning Wishes In Marathi: तुम्ही आपल्या प्रियजनांना गुड मॉर्निंगच्या शुभेच्छा देण्यासाठी चांगला संदेश शोधत आहात का? तर, तुमचा शोध इथे थांबणार आहे. आम्ही तुमच्यासाठी काही खास गुड मॉर्निंग मेसेज घेऊन आलो आहोत. आपल्या जवळचे मित्र आणि आप्तस्वकीय आपल्यासाठी किती खास आहेत, हे तुम्ही या मेसेजेसमधून त्यांना नक्कीच सांगू शकता. पाहा ‘हे’ खास मेसेज…
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,
नाजूक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…
नाते सांभाळायचे असेल तर,
चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,
आणि,नाते टिकवायचे असेल तर
नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी.
शुभ सकाळ!
वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही,
कारण वेळ चांगली असेल तर,
सगळे आपले असतात आणि वेळ खराब असेल तर,
आपले पण परके होतात
वेळच आपल्या व परक्यांची ओळख करून देते!
शुभ सकाळ!
यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर दोन गोष्टी असतात,
एक सहनशीलता आणि दुसरे हास्य.
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही.
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.
सुप्रभात
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो..
म्हणून काही माणसे क्षणभर,
तर काही माणसे
आयुष्यभर लक्षात राहतात..
शुभ सकाळ!
आयुष्य कितीही कडू असलं तरी,
माझी माणसं मात्र खूप गोड आहेत,
अगदी तुमच्यासारखी..
शुभ सकाळ!
मदत ही खूप महाग गोष्ट आहे,
याची प्रत्येकाकडून अपेक्षा करू नका.
कारण खूप कमी लोकं
मनाने श्रीमंत असतात.
सुप्रभात!
गुलाब कोठेही ठेवला तरी,
सुगंध हा येणारंच,
आणि तुमच्यासारखी प्रेमळ माणसे,
कोठेही असली तरी,
आठवण ही येणारंच!
शुभ सकाळ!
जेव्हा सगळंच संपून गेलंय
असं आपल्याला वाटतं,
तीच खरी वेळ असते नवीन काहीतरी
सुरु होण्याची..!
भविष्याची जराही कल्पना नसताना
आपण मोठ्या गोष्टींचे नियोजन
करतो तोच खरा मनाचा
“आत्मविश्वास”!
शुभ सकाळ
आनंदापेक्षाही मोठा असा एक आनंद आहे,
तो त्यालाच मिळतो;
जो स्वत:ला विसरून
इतरांना आनंदित करतो.
शुभ सकाळ
एका मिनिटात आयुष्य बदलू शकत नाही..
मात्र, एक मिनिट विचार करून,
घेतलेला निर्णय आयुष्य बदलू शकतो.
शुभ सकाळ!
ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जीवनाची सुरुवात कुठूनही करता येते.
शुभ सकाळ