Good Morning Wishes In Marathi: सकाळी पाठवलेला एक सुंदर मेसेज तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर गोंडस स्मित हास्य घेऊन येतो आणि त्यांचा दिवस आनंदी करतो. आपल्या दिवसाची सुरुवात चांगली करा आणि आपला संपूर्ण दिवस आनंदात घालवा, याच इच्छेने आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर गुड मॉर्निंग शायरी संदेश घेऊन आलो आहोत. हे गुड मॉर्निंग शायरी संदेश केवळ आपलाच नव्हे, तर आपल्या प्रियजनांनाचा दिवसही सकारात्मक बनवू शकतात. आयुष्यात यश मिळवण्यासाठी माणसाने नेहमी चांगल्या संगतीत आणि विचारांमध्ये असायला हवे. चला तर मग, या सुंदर गुड मॉर्निंग मेसेजेसने एका सुंदर दिवसाची सुरुवात करूया.
मन किती मोठ आहे हे महत्वाचं नाही,
मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे!
--------------------------
कोणी कोणाच्या आयुष्यात कायमचे राहत नाही
पाने उलटले की जुने काही आठवत नाही
आपण नसल्याने कोणाला आनंद झाला तरी चालेल पण
आपल्या आस्तिवाने कोणालाही दु:ख होता कामा नये!
शुभ सकाळ!
--------------------------
आपल्या राशीवर नाही तर, आपल्या कर्मांवर विश्वास ठेवा,
रास तर राम आणि रावणाची पण एकच होती,
पण नियतीने दोघानाही त्यांच्या कर्मानुसाच फळ दिलं!
सकाळच्या सुंदर शुभेच्छा
--------------------------
वेळ सोडून या जगात कोणीच अचूक न्यायाधीश नाही,
कारण वेळ चांगली असेल तर सगळे आपले असतात,
आणि वेळ खराब असेल तर आपले पण परके होतात,
वेळच आपल्या व परक्यांची ओळख करून देते!
शुभ सकाळ
--------------------------
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो,
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील!
शुभ सकाळ
--------------------------
गर्व करून कुठल्याही नात्याला तोडण्यापेक्षा
माफी मागून नाती जपा,
कारण वेळ आल्यावर पैसा नाही तर,
आपल्या जिवाभावाची माणसच साथ देतात!
शुभ सकाळ
--------------------------
गर्दीत आपली माणसं ओळखायला शिकलात तर,
संकटाच्यावेळी आपली माणसं गर्दी करायला विसरत नाहीत
वाक्य लहान आहे पण खूप महत्वाचं आहे.
--------------------------
सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो,
पण सत्य कधीच हरत नाही,
संघर्ष करत असताना कधीच घाबरायचं नाही,
कारण माणूस त्या काळात एकटाच असतो,
यशस्वी झाल्यावर तर सर्व दुनिया बरोबर असते!
शुभ सकाळ