Good Morning Wishes In Marathi: दिवसाची सुरुवात नेहमी उत्साहाने आणि नवीन उर्जेने करावी. प्रत्येक दिवस स्वतःमध्ये एक नवीन अनुभव आणि ऊर्जा घेऊन येतो. यामध्ये नवीन सकारात्मक गोष्टी असण्याची शक्यता असते. चांगली सुरुवात आपल्याला नव्या उंचीवर नेऊ शकते. गुड मॉर्निंगची सुरुवात जर चांगल्या विचारांनी होत असेल, तर आणखी काय हवे. शिवाय तुम्ही तुमच्यासोबत तुमच्या जवळच्या व्यक्तींनासुद्धा हीच सकारात्मक ऊर्जा देऊ शकता. त्यासाठी त्यांना फक्त एका मेसेजसोबत गुड मॉर्निंग म्हणण्याची गरज आहे. तुमच्या एका मेसेजने एखाद्याचा दिवस चांगला होऊ शकतो. तुम्ही सोशल मीडियावर शुभ सकाळचे हे मेसेज तुमच्या मित्रांना शेअर करू शकता.
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलंच मिळेल.
शुभ सकाळ!
…
संयम राखणे हा
आयुष्यातला फार मोठा गुण आहे.
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.
शुभ सकाळ!
…
सिंह बनून जन्माला आले तरी
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते कारण या जगात
नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही.
शुभ सकाळ!
…
सुखाची अपेक्षा असेल…
तर दुःख ही भोगावे लागेल,
प्रश्न विचारावयाचे असतील...
तर उत्तर ही द्यावे लागेल…
हिशोब भावनांचा अन् वेदनांचा कधीच
लावता येत नाही जगात…
जीवनात यश हवे असेल…
तर संकटांना सामोरे जावेच लागेल.
गुड मॉर्निंग
…
शुभ सकाळ म्हणजे केवळ
शुभेच्छा देण्याची औपचारिकता नव्हे तर,
दिवसाच्या सुरवातीच्या पहिल्या मिनिटाला मी तुमची
काढलेली आठवण आहे.
शुभ सकाळ!
…
एखाद्या अडचणीत देवाने तुमचे
लगेच ऐकले की तुमची श्रद्धा वाढते,
उशीरा ऐकले की, तुमची सहनशक्ती वाढते
पण ऐकलेच नाही तर,
समजून जा की देवाला ठाऊक आहे,
ही अडचण तुमची तुम्हीच सोडवू शकता.
स्वतःवर विश्वास ठेवा!
शुभ सकाळ!
…
नारळाचे मजबूत कवच
फोडल्याशिवाय आतमधील
अमृताचा आस्वाद घेऊ शकत नाही.
त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेत येणाऱ्या
संकटावर मात केल्याशिवाय
यशाचा आस्वाद घेणे शक्य नाही.
संकट म्हणजे अपयश नव्हे तो यशाचाच
एक भाग आहे!
शुभ सकाळ
…
निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाहीत,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाहीत.
शुभ सकाळ
…
यशस्वी व्हायचं असेल तर
सुरुवात एकट्यानेच करावी लागते.
जेव्हा तुम्ही जिंकू लागता,
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या