Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वीही आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियाजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे’ मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
कोमलता हा हृदयाच्या धर्म आणि सबलता हा देहाचा धर्म,
देहाला वज्रापेक्षाही अधिक मजबूत बनवा आणि
हृदयाला फुलापेक्षाही अधिक कोमल बनवा.
तुमच्या विचारांप्रमाणे तुम्ही घडता.
तुम्ही जर स्वत:ला दुर्बळ समजलात
तर दुर्बळ बनाल
आणि सामर्थ्यशाली समजलात
तर सामर्थ्यशाली बनाल.
शुभ सकाळ
जर एखाद्यास आनंदी करण्याची
संधी मिळाली तर सोडू नका,
देवदूत असतात ती माणसं
जी दुसऱ्यांच्या आनंदाची काळजी घेतात.
सुखद व मंगलमय दिवसाची शुभेच्छा
शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाकली
तुझ्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली
शुभ सकाळ
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून
शुभ सकाळ
आकाशाला पुन्हा तांबडा रंग फुटलाय
पांढऱ्या धुक्यातून सूर्य वर आलाय
माझ्या मनात आनंदाचं सुंगध दरवलाय
कारण तुला भेटण्यासाठी आज पुन्हा नवा दिवस उगवलाय
शुभ सकाळ
एकच आस, एक विसावा
तुझा मेसेज रोज दिसावा
परमेश्वराकडे हिच प्रार्थना
तुझा सहवास कायम मिळावा
शुभ सकाळ
स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला
दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती वाटत नाही
अशा सामर्थ्यशाली व्यक्तीला हरवण्याचे धाडस
नियतीसुद्धा कधीच करत नाही.
शुभ सकाळ
खेळ शिकायचा असेल तर बुद्धीबळाचा शिका
कारण त्यात एक चांगला नियम आहे
आपली माणसं आपल्याच माणसांचा कधीच पराभव करत नाहीत
शुभ सकाळ
आरसा आणि ह्रदय
दोन्ही तसे नाजूक असतात
फरक एवढाच…
आरशात सगळे दिसतात आणि
ह्रदयात फक्त आपलेच दिसतात!
शुभ सकाळ
प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो.
फक्त आपल्याजवळ कृतज्ञतेची किल्ली असावी लागते,
सुख म्हणजे नक्की काय असतं,
कालच्या दिवसाची खंत नसणं आणि
आजच्या दिवसाची चिंता नसणं!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या