Good Morning Wishes In Marathi: जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची सुरुवात करायची असेल, तर त्यांना सुंदर सकाळची गोड आठवण द्या. सकाळी डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात, याची जाणीव करून द्या. यासाठी, सकाळीच त्यांना एखादा खास मेसेज पाठवा. जेव्हा ते आपला अलार्म बंद करण्यासाठी किंवा वेळ तपासण्यासाठी मोबाईल हातात घेतील, तेव्हा तुमचा मेसेज वाचून नक्की खुश होतील. तुमचे नाव पाहून त्यांच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू येईल. मग, जेव्हा ते मेसेज वाचण्यासाठी व्हॉट्सॲप, फेसबुक किंवा इंस्टाग्राम उघडतील, तेव्हा त्यांच्या दिवसाची आनंदी सुरुवात नक्की होईल.
प्रत्येक सकाळ ही एक नवीन सुरुवात असते,
हसत आणि प्रेमाने गुड मॉर्निंग म्हणण्याची वेळ असते!
शुभ सकाळ
तुमची सकाळ अशी आनंददायी जावो,
भूतकाळातील सगळी दु:ख जुनी होऊन जावो,
हा दिवस तुम्हाला खूप आनंद देवो,
आनंदही तुमच्या हसण्याने वेडा होवो!
शुभ प्रभात
सकाळच्या या ताज्या क्षणांमध्ये,
आयुष्याच्या सर्व सुंदर गोष्टी साजऱ्या करूया,
आशा, आनंद आणि प्रेम यांच्या त्रिवेणीत,
तुमचा प्रत्येक दिवस खास अंदाजात फुलवुया!
गुड मॉर्निंग
या सकाळी, सूर्योदयाचे तेज तुमच्या जीवनात नव्या दिशा आणो,
स्वप्न पूर्ण करण्याची, आणि नव्याने सुरुवात करण्याची ऊर्जा देवो!
शुभ सकाळ
प्रत्येक नवीन सकाळ ही आपल्याला आयुष्यातील नवीन संधी देते,
त्याचा सदुपयोग करून आपल्या स्वप्नांना पंख द्या!
सुप्रभात
सकाळच्या या कोमल क्षणांत,
उमेदीचा संदेश घेऊन येतो,
तुमच्या जीवनाच्या प्रत्येक पानावर,
सुखाचा इतिहास लिहितो!
शुभ सकाळ
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
शुभ सकाळ
आपण जे देतो ते आपल्याकडे परत येतं,
त्यामुळे चांगलं द्या, तर चांगलच मिळेल.
शुभ सकाळ
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या श्रीमंतीपेक्षा,
तुमच्या सारखा सोन्याहून मौल्यवान
माणसांचा गोतावळा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत!
शुभ सकाळ
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध हा येणारच,
आणि आपली माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच!
शुभ सकाळ
संबंधित बातम्या