Good Morning Wishes In Marathi: जर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असाल आणि आपल्या प्रियजनांनी देखील त्यांची स्वप्ने लवकर पूर्ण करावीत, अशी तुमची इच्छा असेल तर त्यांना प्रेरित करण्यासाठी तुम्ही हे प्रेरणादायी गुड मॉर्निंग संदेश सकाळी पाठवू शकता. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतरच आपण आपले ध्येय गाठू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यातील या चढउतारांना सामोरे जाताना कधीही हार मानू नये. ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येक क्षणी प्रेरित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तरच, आपल्याला आपल्या मार्गावर राहण्याचे बळ मिळते. आयुष्यातील प्रत्येक क्षणी तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून आम्ही हे सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी गुड मॉर्निंग संदेश घेऊन आलो आहोत.
वाईटाची एक कमजोरी असते,
की ते कधी हार मानत नाहीत!
आणि चांगल्याची एकच सवय
की ते कधीच हरत नाहीत...!
शुभ सकाळ
---------------------------------
पूर्णविराम म्हणजे शेवट नाही,
कारण आपण त्यानंतर नवीन वाक्य लिहू शकतो,
त्याच प्रमाणे जीवनात अपयश आले,
तर तो खरा शेवट नसतो तर,
ती नव्या यशाची सुरुवात असते!
शुभ सकाळ
---------------------------------
यशस्वी व्यक्ती चेहऱ्यावर नेहमी दोनच गोष्टी ठेवतात.
स्मितहास्य व शांतपणा
स्मितहास्य - समस्या सोडवण्यासाठी….
शांतपणा - समस्येपासून दूर राहण्यासाठी...
सुप्रभात
---------------------------------
पुण्य दिसत नाही, पण वेळ आली की बरोबर उपभोगता येतं,
कारण कमावलेल्या पैशाचं काम जिथं थांबतं,
तिथूनच केलेल्या पुण्याचं काम सुरू होतं!
---------------------------------
मन आणि घर वेळोवेळी स्वच्छ ठेवावे,
कारण घरात निरर्थक गोष्टी,
मनात निरर्थक गैरसमज अनेकदा भरलेले असतात!
शुभ सकाळ
---------------------------------
बुद्धीचा वापर करण्याऱ्यापेक्षा मनाचा वापर करणारे जास्त चांगले असतात,
कारण बुद्धीचा वापर करणारे आधी स्वतःचा विचार करतात,
पण मनाचा वापर करणारे सर्वात आधी दुसर्यांचा विचार करतात!
शुभ सकाळ
---------------------------------
आयुष्यातल्या असंख्य प्रॉब्लेमची,
फक्त दोनच कारणं असतात,
एकतर आपण विचार न करता कृती करतो,
किंवा कृती करण्याऐवजी,
फक्त विचारच करत बसतो!
सुप्रभात
---------------------------------
आयुष्य ही फार अवघड शाळा आहे
आपण कोणत्या वर्गात आहोत हे
आपल्याल ठाऊक नसतं,
पुढची परीक्षा कोणती
याची कल्पना नसते,
आणि कॉपी करता येत नाही कारण,
प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते!
गुड मॉर्निंग