Good Morning wishes: तुमचा दिवस चांगला जावो, अशा द्या प्रियजनांना सकाळच्या सुंदर शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning wishes: तुमचा दिवस चांगला जावो, अशा द्या प्रियजनांना सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning wishes: तुमचा दिवस चांगला जावो, अशा द्या प्रियजनांना सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Published Oct 27, 2024 08:58 AM IST

Good Morning Status: जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message (freepik)

Good Morning Marathi Message:  कुणाला चांगले विचार पाठवल्यानेही तुमच्या मनाला आनंद मिळतो. याशिवाय समोरच्या व्यक्तीचा दिवसही चांगला जाऊ शकतो. अशा वेळी जर तुम्ही तुमच्या प्रियजनांना सकाळी चांगले विचार पाठवले, तर त्यामुळे तुम्हाला मानसिक शांतीही मिळते. जीवनाचा अर्थ समजावून सांगणारे सुविचारांसह सुप्रभात संदेश पाठवून, समोरच्या व्यक्तीलाही सकारात्मकता मिळते. तुम्हालाही तुमचा दिवस इतरांसारखा बनवायचा असेल, तर त्यांना खाली लिहिलेल्या सकाळच्या शुभेच्छा नक्कीच पाठवा.

 

आज एक नवीन दिवस आहे,

आणि त्याच्याबरोबर नवीन संधी देखील आहे.

प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या

आणि तुमची सकाळ चांगली जावो.

 

आयुष्याच्या शर्यतीमध्ये फक्त

हे महत्वपूर्ण नाही की कोण

आपल्या पुढे आहे आणि कोण

आपल्या पाठीमागे आहे,

तर हे सुद्धा पाहिले पाहिजे की

कोण आपल्या सोबत आहे

आणि आपण कोणासोबत आहोत.

 

तुमची विचारसरणीच तुम्हाला मोठं बनवते !!

जर आपल्याला गुलाबासारख बहरायचे असेल

तर काट्यांसह समन्वयाची कला शिकायला हवी.

गुड मॉर्निंग!

 

“जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे,

ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे,

गमावू नका. ”

नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.

शुभ सकाळ!

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट

कधी भरत नाही,

आणि वाटून खाणारा कधी,

उपाशी मरत नाही.

शुभ सकाळ!

 

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी !

शुभ सकाळ!

 

थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,

ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,

भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,

सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,

हीच खरी नाती मनांची,

सकाळच्या सुंदर शुभेच्छा.

 

“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,

पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,

आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,

“नाही” लवकर बोलल्यामुळे,

आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.

शुभ सकाळ !

 

जी माणसे “दुसऱ्याच्या” चेहऱ्यावर,

आनंद निर्माण करण्याची क्षमता ठेवतात,

ईश्वर “त्यांच्या” चेहऱ्यावरचा आनंद,

कधीच कमी होऊ देत नाही..

शुभ सकाळ!

प्रेम करणारी माणसं या जगात खूप भेटतात,

पण समजून घेणारी आणि

समजून सांगणारी व्यक्ती भेटायला भाग्य लागते.

शुभ सकाळ !

Whats_app_banner