Good Morning Marathi Message: दररोज सकाळी आपण आपल्या सभोवतालच्या लोकांना शुभेच्छा देतो जेणेकरून ते दिवसाची सुरुवात आनंदाने करतील. एखाद्याला शुभ सकाळच्या शुभेच्छा देणे किंवा एखाद्याला शुभ दिवसाच्या शुभेच्छा देणे हे आपण आपल्या कुटुंबाला आणि मित्रांना देऊ शकतो अशा सर्वोत्तम भेटींपैकी एक आहे. असे सुप्रभात संदेश आपल्याला आनंदी आणि सकारात्मक बनवतात. येथे आम्ही विविध शुभेच्छा संदेश तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.
वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ.
जिव्हाळायाचे ऋणानुबंध
असल्याशिवाय कोणी कोणाच्या
आयुष्यात येत नाही.
सुप्रभात!
दिवा कधीच बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याच्या कामाचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही तुमच्या विषयी काहीच बोलू नका
चांगले कर्म करत रहा
तेच तुमचा परिचय या दुनियेला देतील.
शुभ सकाळ!
मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध
हा येणारच, आणि आपली
माणसे किती लांब असली
तरी आठवण ही येणारच…
शुभ सकाळ!
आपुलकी असेल तर जीवन सुंदर
फुले असतील तर बाग सुंदर
गालातल्या गालात एक छोटस हसु असेल
तर चेहरा सुंदर आणि
नाती मनापासून जपली तरच आठवणी सुंदर
शुभ सकाळ!
माझ्यामागे कोण काय बोलतं
याने मला काहीच फरक पडत नाही,
माझ्यासमोर काही बोलण्याची त्यांची
हिम्मत नाही, यातच माझा विजय आहे.
गुड मॉर्निंग!
या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात
पण चालणारे आपण एकटेच असतो,
पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,
पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.
शुभ सकाळ!
छापलेली पुस्तके वाचल्याने
खरे ज्ञान मिळत नाही.
अनुभवाचे पुस्तक वाचल्याने
खरे ज्ञान मिळते, कारण
छापलेल्या पुस्तकांचे लेखक
अनेक असतात पण
अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक
आपण स्वत: असतो.
सुप्रभात!
संबंधित बातम्या