Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे’ मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही,
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल,
ते कोणालाच माहित नसते!
म्हणुन आनंदी रहा.
शुभ सकाळ!
वेळ, मित्र आणि नाती
ह्या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
पण ह्या हरवल्या की समजते,
त्यांची किंमत किती मोठी असते.
शुभ सकाळ
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी
कधीही परत येत नाही असेच वेळेचेही आहे
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात
आपल्यात लपलेले परके
आणि परक्यात लपलेले आपले
जर तुम्हाला ओळखते आले तर,
आयुष्यात वाईट दिवस पाहण्याची वेळ
आपल्यावर कधीच येणार नाही.
शुभ सकाळ
हसता-खेळता घालवुया
दिवसाचा प्रत्येक क्षण
भगवंताच्या नामस्मरणाने
ठेवुया प्रसन्न मन
आनंदाने फुलवुया
जीवनाचा सुंदर मळा
सद्विचारांच्या रंगाने
रंगवुया मनाचा फळा
सुर्योदयाच्या साक्षीने देऊ
सर्वांना शुभेच्छा
सुख-समाधान-शांती लाभो
हीच ईश्वर चरणी इच्छा.
शुभ सकाळ
तोंडी साखरेचा, गोडवा कायम असावा
मनात कुणाच्या, कधी राग नसावा
आयुष्यात जोडावी माणसे, जपावी नाते
विसरून जावे व्यवहारी, फायदे तोटे
सुख क्षणांचे मणी, हळुवार प्रेमाने ओवावे,
आनंदी सुरांनी, मनास छेडावे.
आयुष्यात निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा रहा
नाती कधीच तुटत नाही.
शुभ सकाळ