Good Morning Wishes and Messages In Marathi: प्रत्येक दिवसाची पहाट म्हणजे माणूस नव्या लढाईसाठी सज्ज होतो. ही स्थिती जाणून आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी आणि जवळच्या लोकांसाठी प्रेरणा म्हणून काम करता येते. तुमच्या मित्र मैत्रिण किंवा एखाद्या खास व्यक्तीला मनापासून प्रेरित करून पुढे जाताना पाहायचे असेल तर सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा संदेश त्यांना पाठवता येते. एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासोबतच त्यांच्या दिवसाला मोटिव्हेट करायचं असेल तर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे गुड मॉर्निंग मॅसेज त्यांना पाठवा.
सकाळची किरणे बोलत आहेत,
नवीन रंगांनी स्वप्नांच्या गोष्टी आणल्या आहेत.
सुखाचा प्रवास सुरू झाला आहे,
तुमच्यासाठी एक नवी पहाट घेऊन आली आहे.
-------------------------------
सत्याच्या वाटेवर स्वप्न तुटून जातात,
निसर्ग बदलला की फुले सुकून जातात,
मनापासून आठवण काढली आहे तुमची,
पुन्हा म्हणू नका आपली माणसे विसरून जातात.
शुभ सकाळ
-------------------------------
सगळी दु:ख दूर झाल्यावर
मन प्रसन्न होईल हा भ्रम आहे,
मन प्रसन्न करा…
सगळी दु:ख दूर होतील…!
शुभ सकाळ
-------------------------------
धुक्याकडून एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते,
जीवनात रस्ता दिसत नसेल तर
दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला,
रस्ता आपोआप मोकळा होत जाईल!
शुभ सकाळ
-------------------------------
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी,
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ!
-------------------------------
वेळ, मित्र आणि नाती
या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
पण या हरवल्या की समजते,
त्यांची किंमत किती मोठी असते.
शुभ सकाळ
-------------------------------
फुलाला वाढायला ज्याप्रकारे सूर्य
किरणांची आवश्यकता असते तसेच
मनुष्याला प्रगतीसाठी चांगल्या
विचारांची आवश्यकता असते.
तुमच्या गुणवत्तेवर किंवा क्षमतेवर
कोणी शंका घेत असेल तर
मुळीच कमीपणा वाटू देवू नका.
कारण लोक नेहमी
सोन्याच्या शुद्धतेवरच शंका घेतात,
लोखंडाच्या नाही!
शुभ सकाळ
-------------------------------
सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे
सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस
सोनेरी दिवसाच्या सोनेरी शुभेच्छा
केवळ सोन्यासारख्या लोकांना.
-------------------------------
चांगली भूमिका, चांगली ध्येय आणि
चांगले विचार असणारे लोक नेहमी आठवणीत राहतात..
मनातही, शब्दातही आणि आयुष्यातही.
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या