प्रत्येक दिवशीच्या पहाटे माणूस एका नव्या लढाईसाठी सज्ज होत असतो. या लढाईत आपल्याला आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी आणि जवळच्या लोकांसाठी प्रेरणा म्हणून काम करता येते. तुमच्या मित्र मैत्रिण किंवा एखाद्या खास व्यक्तीला मनापासून प्रेरित करून पुढे जाताना पाहायचे असेल तर सकारात्मक ऊर्जेने भरलेला हे संदेश त्यांना पाठवता येऊ शकतात. एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासोबतच त्यांच्या दिवसाला मोटिव्हेट करायचं असेल तर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे गुड मॉर्निंग मॅसेज त्यांना पाठवा.
जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं,
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हाच होईल,
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल,
---------------------------------
माणसाच्या मुखात गोडवा, मनात अपुलकी,
वागण्यात नम्रता आणि हृदयात प्रेम असलं की,
बाकी चांगल्या गोष्टी आपोआप घडतात!
शुभ प्रभात
---------------------------------
प्रेमळ माणसं तुम्हाला कधी वेदना देतीलही,
पण त्यांचा उद्देश फक्त तुमची
काळजी घेणं हाच असतो.
जगातलं कटु सत्य हे आहे की,
नाती जपणाराच नेहमी सर्वांपासून दुरावला जातो..
तसे असले तरीही नाती जपण्यातच खरा आनंद आहे!
शुभ सकाळ
---------------------------------
वेळ, मित्र आणि नाती
या अशा तीन गोष्टी आहेत की,
त्यांना किंमतीचे लेबल नसते.
पण या हरवल्या की समजते,
त्यांची किंमत किती मोठी असते.
---------------------------------
कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधांनी
आणि सूर्याच्या कोमल किरणांनी,
ही सकाळ आपलं स्वागत करत आहे.
शुभ सकाळ !
---------------------------------
हळवी असतात मने,
जी शब्दांनी मोडली जातात..
अन् शब्दच असतात जादूगार,
ज्यांनी माणसे जोडली जातात…
शुभ सकाळ!
---------------------------------
किती दिवसाचे आयुष्य असते?
आजचे अस्तित्व उद्या नसते,
मग जगावे ते हसून-खेळून कारण
या जगात उद्या काय होईल
ते कोणालाच माहित नसते..
म्हणून आनंदी रहा.
शुभ सकाळ!
---------------------------------
जो डोळ्यांतील भाव ओळखून,
शब्दातील भावना समजतो,
तो मन जिंकून कायम हृदयात राहतो.
शुभ सकाळ
---------------------------------
जगा इतकं की आयुष्य कमी पडेल,
हसा इतके की आनंद कमी पडेल,
काही मिळाले तर नशिबाचा खेळ आहे,
पण प्रयत्न इतके करा की,
परमेश्वराला देणे भागच पडेल.