Good Morning Wishes : ढगा आड उडणाऱ्या गरूडाला पण तुमचा हेवा वाटला पाहिजे! खास मेसेजमधून म्हणा गुड मॉर्निंग
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes : ढगा आड उडणाऱ्या गरूडाला पण तुमचा हेवा वाटला पाहिजे! खास मेसेजमधून म्हणा गुड मॉर्निंग

Good Morning Wishes : ढगा आड उडणाऱ्या गरूडाला पण तुमचा हेवा वाटला पाहिजे! खास मेसेजमधून म्हणा गुड मॉर्निंग

Dec 22, 2024 08:58 AM IST

Good Morning Wishes In Marathi : एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासोबतच त्यांच्या दिवसाला मोटिव्हेट करायचं असेल तर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे गुड मॉर्निंग मॅसेज त्यांना पाठवा.

life motivating good morning wishes
life motivating good morning wishes (shutterstock)

Good Morning Wishes and Messages In Marathi: प्रत्येक दिवसाची पहाट म्हणजे माणूस नव्या लढाईसाठी सज्ज होतो. ही स्थिती जाणून आपल्या मित्र-मैत्रिणींसाठी आणि जवळच्या लोकांसाठी प्रेरणा म्हणून काम करता येते. तुमच्या मित्र मैत्रिण किंवा एखाद्या खास व्यक्तीला मनापासून प्रेरित करून पुढे जाताना पाहायचे असेल तर सकारात्मक ऊर्जेने भरलेला हा संदेश त्यांना पाठवता येते. एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवात चांगली करण्यासोबतच त्यांच्या दिवसाला मोटिव्हेट करायचं असेल तर प्रेम आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले हे गुड मॉर्निंग मॅसेज त्यांना पाठवा.

आयुष्य खूप सुंदर आहे,

उतुंग भरारी मारा,

ढगा आड उडणाऱ्या गरूडाला

पण तुमचा हेवा वाटला पाहिजे

इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत

 

 

अडचणी आयुष्यात नव्हे, तर मनात असतात,

ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल,

त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल…

आपला दिवस शुभ असो

शुभ सकाळ!

 

 

प्रेमाच्या पाझरांची वाहती

एक सरीता,

नात्यांच्या अतुट शब्दांनी

गुंफलेली कविता,

जाणिवेच्या पलीकडच

जगावेगळ गाव,

यालाच तर आहे “आयुष्य” हे नाव

तुमचा दिवस सुखाचा जावो

शुभ सकाळ!

 

 

माणसाला जिंकायचे ते केवळ आपुलकीने,

कारण वेळ पैसा सत्ता आणि शरीर,

एखादे वेळेस साथ देणार नाही ,

पण माणुसकी प्रेमळ स्वभाव

आणि आत्मविश्वास कधीही

तुम्हाला एकटे पडू देणार नाही…

शुभ सकाळ!

 

अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते

उन्हात फिरताना सावलीची गरज असते

जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते

माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ

 

 

नवा दिवस नवी सुरूवात

नवी प्रेरणा आणि तुझी साथ

आयुष्य सुंदर आहे तुझा हात हातात आहे

परमेश्वराकडे मी यासाठी कृतज्ञ आहे

शुभ सकाळ

 

 

मनातले अबोल संकेत

ज्यांना न बोलता कळतात

त्यांच्याशीच मनांची

खोल नाती जुळतात

शुभ सकाळ!

 

 

धावपळीच्या या जीवनात कोण

कोणाची आठवण काढत नाही

पण मला मात्र आपल्याला रोज

शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

शुभ सकाळ

 

 

सुंदर विचार…

आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलच मिळेल.

 

 

मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…

शुभ सकाळ

Whats_app_banner