Good Morning Wishes: 'सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात'...अशा द्या प्रियजनांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा
मराठी बातम्या  /  धर्म  /  Good Morning Wishes: 'सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात'...अशा द्या प्रियजनांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Good Morning Wishes: 'सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात'...अशा द्या प्रियजनांना सुंदर सकाळच्या सुंदर शुभेच्छा

Published Oct 29, 2024 08:51 AM IST

Good Morning Marathi Message: आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सकारात्मक आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात.

Best Good Morning Wishes Messages:
Best Good Morning Wishes Messages: (pixabay)

Best Good Morning Wishes Messages:  जेव्हा कोणी प्रेमाने सुप्रभात म्हटल्यावर दिवसाची सुरुवात अधिक छान होते. शुभ सकाळच्या शुभेच्छा दिल्याने समोरच्या व्यक्तीमध्ये ऊर्जा निर्माण होते. आजकाल, बरेच लोक सुप्रभात म्हणण्यासाठी सकारात्मक आणि सुंदर संदेश शोधतात. तुम्ही देखील गुड मॉर्निंग संदेश शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. येथे तुम्हाला १० सर्वोत्तम संदेश सापडतील, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या प्रियजनांना सुप्रभात म्हणू शकता.

 

तीच खरी तुमच्या जवळची माणसं असतात,

जी तुमच्या आवाजावरून तुमच्या

सुखाचा आणि दुःखाचा अंदाज लावतात..

 

मन किती मोठं आहे हे महत्वाचं नाही,

मनात आपलेपणा किती आहे हे महत्वाचं आहे..

 

कोणी आपल्याला वाईट म्हटले तर,

फारसे मनावर घेऊ नये कारण,

या जगात असा कोणीच नाही,

ज्याला सगळे चांगले म्हणतील…

शुभ सकाळ!

 

मनातून येणा-या आठवणी,

कोणीतरी समजणारं असावं..

जीवनात सुख:दुखात साथ देणारं,

एक सुंदर नातं असावं..

शुभ सकाळ!

चेहरा आणि पैसा पाहून आपल्याला,

मैत्री किंवा नातं करायला आवडत नाही,

आपल्याला फ़क्त “माणसे” महत्वाची आहेत,

ती पण तुमच्या सारखी..!

शुभ सकाळ!

 

हसता-खेळता घालवुया दिवसाचा,

प्रत्येक क्षण..

भगवंताच्या नामस्मरणाने ठेवुया,

प्रसन्न मन..

शुभ सकाळ!

 

उत्तर म्हणजे काय ते,

प्रश्न पडल्याशिवाय कळत नाही…

जबाबदारी म्हणजे काय हे,

त्या सांभाळल्याशिवाय कळत नाही…

शुभ सकाळ !

 

सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात,

नाजूक उन्हाची प्रेमळ साद,

मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,

रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ…

सुप्रभात!

स्वतासाठी सुंदर घर करणे हे

प्रत्येकाचे एक स्वप्न असते,

पण.. एखाद्याच्या मनात घर करणे,

यापेक्षा सुंदर काहीच नसते…

सुप्रभात!

 

नाते सांभाळायचे असेल तर

चुका सांभाळून घेण्याची मानसिकता असावी,

आणि,नाते टिकवायचे असेल तर

नको तिथे चुका काढण्याची सवय नसावी..

शुभ सकाळ!

Whats_app_banner