Good Morning marathi Status: आपल्या सकाळची सुरुवात चांगल्या आणि गोड पद्धतीने व्हावी असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळेच प्रत्येकजण आपल्या सकाळची सुरुवात अगदी उत्साही आणि सकारात्मक वातावरणात करतो. त्याप्रमाणेच जर आपल्या जवळच्या लोकांच्या सकाळची सुरुवातसुद्धा आपल्या आठवणीने आणि सकारात्मकतेने व्हावी अशी आपली इच्छा असते. त्यामुळे अनेकजण सकाळी उठल्याबरोबर आपल्या प्रियजनांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभ सकाळचे मेसेज पाठवून शुभेच्छा देत असतो. तुम्हालाही तुमच्या खास व्यक्तींच्या चेहऱ्यावर हसू पाण्याचे असेल आणि त्यांचा दिवस सुंदर बनवायचा असेल, तर खाली दिलेले हे सुंदर संदेश तुम्ही शकता...
''वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा…
आजच्या सुंदर दिवसाची सुरुवात
गणपती दर्शनाने करूया…''
''यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते !!
जेव्हा तुम्ही जिंकू लागता;
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात…''
“हो” आणि “नाही” हे दोन छोटे शब्द आहेत,
पण ज्याविषयी खूप विचार करावा लागतो,
आपण जीवनात बऱ्याच गोष्टी गमावतो,
“नाही” लवकर बोलल्यामुळे,
आणि, “हो” उशिरा बोलल्यामुळे.''
शुभ सकाळ !
''शोधणार आहात तर
काळजी करणारे शोधा कारण
गरजेपुरता वापरणारे
स्वतःच तुम्हाला शोधत येतात !''
शुभ सकाळ!
''रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.''
शुभ प्रभात!
''नाती तयार होतात
हेच खूप आहे,
सर्व आनंदी आहेत
हेच खूप आहे,
दर वेळी प्रत्येकाची
सोबत होईल असं नाही,
एकमेकांची आठवण
काढत आहोत हेच खूप आहे.''
सुप्रभात!
''नात… म्हणजे काय…
ते कोणाच्याही सांगण्यावरून जुळू नये.
आणि
कुणी काहीही सांगितलं म्हणुन तुटू नये…
असा भक्कम लावलेला जीव म्हणजे नात.''
शुभ सकाळ!
''यशस्वी व्यक्तीच्या चेहऱ्यावर
दोन गोष्टी असतात एक सहनशीलता आणि हास्य
कारण हास्य त्याचे प्रश्न दिसू देत नाही
तर सहनशीलता प्रश्र निर्माणच करत नाही.''
शुभ सकाळ!
''मोबाइलला कुशीत घेऊन झोपलेल्या व
सकाळी झोपेतून उठून प्रथम नेट चालू करणाऱ्या
” नेटसम्राटांना ”
शुभ सकाळ!
''आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो
ते आपलं अस्तित्व असतं आणि
जे आपल्या माघारी चर्चिल जातं
ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि
व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल
तर आपल्या अस्तित्वाला सुध्दा
नेहमी लोकांचा सलाम असतो.''
शुभ दिवस!