Morning Wishes: तुमच्या एका 'गुड मॉर्निंग'ने प्रियजनांचा दिवस होईल खास! पाठवा हे मराठी संदेश-good morning messages in marathi send these beautiful messages to friends ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Morning Wishes: तुमच्या एका 'गुड मॉर्निंग'ने प्रियजनांचा दिवस होईल खास! पाठवा हे मराठी संदेश

Morning Wishes: तुमच्या एका 'गुड मॉर्निंग'ने प्रियजनांचा दिवस होईल खास! पाठवा हे मराठी संदेश

Aug 04, 2024 07:23 AM IST

Good Morning Messages In Marathi: तुमच्या ओळखीच्या लोकांना गुड मॉर्निंग म्हणण्याने तुमचं नातं तर मजबूत होतंच, पण त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवातदेखील अत्यंत चांगली आणि सकारात्मक होते.

Good Morning Messages In Marathi
Good Morning Messages In Marathi

Good Morning Messages In Marathi: सकाळी उठल्याबरोबर एखाद्याला गुड मॉर्निंग म्हणणे ही एक सामान्य सामाजिक प्रथा आहे. परंतु त्याचे अनेक आश्चर्यकारक फायदे आहेत. तुमच्या ओळखीच्या लोकांना गुड मॉर्निंग म्हणण्याने तुमचं नातं तर मजबूत होतंच, पण त्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या दिवसाची सुरुवातदेखील अत्यंत चांगली आणि सकारात्मक होते. अशाने त्यांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन सकारात्मक बनतो. आणि त्यांना आयुष्यात यश मिळवण्यासाठी आणखी धैर्य मिळते. त्यामुळेच आपल्या जवळच्या व्यक्तीला गुड मॉर्निंग संदेश पाठवणे फारच उत्तम असते. आज आम्ही तुम्हाला असेच काही गोड संदेश सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची आणि तुमच्या प्रियजनांची सकाळ अगदी सुंदर होईल.

 

सुंदर गुड मॉर्निंग मेसेज

 

''स्वभाव अशी गोष्ट आहे जो नेहमीसाठी सर्वांचा प्रिय बनवतो,

कितीही कोणापासून दूर व्हा परंतु चांगल्या स्वभावामुळे

कोणत्या ना कोणत्या क्षणी तुमची आठवण होतच असते म्हणूनच

स्वभावसुध्दा माणसाने कमावलेलं सर्वांत मोठं धन आहे.''

शुभ सकाळ!

 

''आपण जे देतो ते आपल्याकडे

परत येतं त्यामुळे चांगलं द्या,

चांगलच मिळेल.

शुभ सकाळ.''

 शुभ सकाळ!

 

''सोन्याचा साठा करुन मिळालेल्या

श्रीमंतीपेक्ष्या तुमच्या सारखा सोन्याहून

मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…''

शुभ सकाळ!

 

''मोगरा कुठे ठेवला तरी सुगंध

हा येणारच, आणि आपली

माणसे किती लांब असली

तरी आठवण ही येणारच…''

शुभ सकाळ!

 

''आवडतं मला त्या लोकांना

सकाळी गुड मॉर्निंग पाठवायला

जे माझ्या समोर नसून सुध्दा

माझ्या मनाच्या अगदी जवळ आहे.''

गुड मॉर्निंग

 

''या जगात वाट दाखवणारे अनेकजण असतात

पण चालणारे आपण एकटेच असतो,

पडल्यावर हसणारे अनेकजण असतात,

पण मदतीचा हात देणारे ते फक्त जिवलगच असतात.''

शुभ सकाळ!

 

''जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका..

कारण उत्तम दिवस आठवणी देतात,

चांगले दिवस आनंद देतात,

वाईट दिवस अनुभव देतात,

तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देतात…!''

शुभ सकाळ!

 

''छापलेली पुस्तके वाचल्याने

खरे ज्ञान मिळत नाही.

अनुभवाचे पुस्तक वाचल्याने

खरे ज्ञान मिळते, कारण

छापलेल्या पुस्तकांचे लेखक

अनेक असतात पण

अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक

आपण स्वत: असतो.''

शुभ सकाळ!

 

''नारळ आणि माणूस

दर्शनी कितीही चांगले

असले तरीही नारळ

फोडल्या शिवाय आणि

माणूस जोडल्याशिवाय

कळत नाही.''

शुभ सकाळ!

''मनाला जोडलेल्या प्रत्येक नात्याला

कोणत्याही नावाची गरज नसते.

न सांगता जुळणाऱ्या नात्यांची

परिभाषा काही वेगळीच असते.''

शुभ सकाळ!

 

 

विभाग