Good Morning Messages In Marathi: जर तुम्ही तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत असाल आणि आपल्या प्रियजनांनी देखील त्यांची स्वप्ने लवकर पूर्ण करावीत, अशी तुमची इच्छा असेल तर त्यांना प्रेरित करण्यासाठी तुम्ही हे प्रेरणादायी गुड मॉर्निंग संदेश सकाळी पाठवू शकता. आयुष्यात अनेक चढ-उतार पाहिल्यानंतरच आपण आपले ध्येय गाठू शकतो, हे प्रत्येकाने लक्षात ठेवले पाहिजे. आयुष्यातील या चढउतारांना सामोरे जाताना कधीही हार मानू नये. ध्येय प्राप्तीसाठी प्रत्येक क्षणी प्रेरित राहणे अत्यंत आवश्यक आहे. तरच, आपल्याला आपल्या मार्गावर राहण्याचे बळ मिळते. ‘हे’ मेसेज वाचून दिवसाची सुरुवात केल्यास तुमचा संपूर्ण दिवस चांगला जाईल, शिवाय तुमची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी तुम्हाला नवी ऊर्जा आणि प्रेरणाही मिळेल.
मन वळू नये, अशी श्रध्दा हवी
निष्ठा ढळू नये, अशी भक्ती हवी
सामर्थ्य संपू नये, अशी शक्ती हवी
कधी विसरु नये, अशी नाती हवी!
सुप्रभात
आवडतं मला लोकांना नेहमी
गुड मॉर्निंग म्हणायला
दूर असूनही मनाच्या कोपऱ्यात
एकत्र साठवून ठेवायला
सुंदर दिवसाची सुंदर सुरुवात
नाजूक उन्हाची प्रेमळ साथ
मंजुळ वाऱ्याची हळूवार हालचाल
अशीच येवो तुमच्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ
तुम्हा सर्वांना शुभ सकाळ
रात्र ओसरली दिवस उजाडला
तुला पाहून सुर्यही चमकला
लखलखत्या किरणांनी झाडे लखाखली
तुमच्याशी गुजगोष्टी करण्यासाठी पहाट उगवली
शुभ सकाळ
अंधारात चालताना प्रकाशाची गरज असते
उन्हात फिरताना सावलीची गरज असते
जीवनात जगताना चांगल्या माणसांची गरज असते
माझ्या आयुष्यातील या चांगल्या माणसांना माझ्याकडून शुभ सकाळ!
मैत्रीचा मोती प्रत्येकाच्या भाग्यात नसतो
कारण समुद्रातही प्रत्येक शिंपल्यात तो नसतो
जो नाती जपतो त्यांनाच तो सापडतो
कारण खऱ्या मोत्यावर त्याचाच अधिकार असतो!
शुभ सकाळ
येणारी प्रत्येक सकाळ इतकी रम्य असावी,
तुझी चिंता काळजी सर्व काही दूर पळून जावी,
येणारा प्रत्येक दिवस आनंद आणि उत्साहाचा असावा,
तुझ्या खूष असण्याचा सर्वांनाच हेवा वाटावा
चांगली माणसं आणि चांगले विचार सोबत असतील,
तर जगात कुणीच तुमचा पराभव करू शकत नाही,
शून्यालाही देता येते किंमत फक्त
त्याच्या पुढे कोण ते महत्त्वाचे आहे.
शुभ सकाळ