प्रत्येक सकाळ एक नवा दिवस घेऊन येत असते. त्यामुळेच तुमची प्रत्येक सकाळ खास असतो. जर तुम्हाला तुमच्या प्रियजनांच्या चेहऱ्यावर हसू आणून सकाळची सुरुवात करायची असेल, तर त्यांना तुमची आठवण करून द्या. तुमचे डोळे उघडताच तुमचे मित्र, नातेवाईक आणि जवळच्या व्यक्तींना तुम्ही त्यांची आठवण काढत आहात याची जाणीव करून द्यायला हवी. आणि त्यासाठी त्यांना सकाळच्या सुंदर शुभेच्छा देणारे संदेश पाठवणे आवश्यक आहे.
आजकाल लोक व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून सहजपणे आपल्या आवडत्या व्यक्तीला सकाळचे संदेश पाठवू शकता. काही लोक सोशल मीडियावर संदेश पाठवून प्रियजनांना शुभ सकाळ म्हणतात तर काही लोक सोशल मीडियावर स्टेटस ठेवून सकाळच्या गोड शुभेच्छा देतात. म्हणूनच तुमच्यासाठी शुभ प्रभात देणारे काही सुंदर संदेश आम्ही सुचविणार आहोत.
चांगली कार्ये, चांगली ध्येये
आणि चांगले विचार
असणारे लोक नेहमीच ध्यानात राहतात,
मनातही, शब्दातही आणि
आयुष्यातही...
शुभ सकाळ
…
धावपळीच्या या जीवनात कोण
कोणाची आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
सुप्रभात म्हणल्या शिवाय राहवत नाही.
सुप्रभात
…
सोन्याचा साठा करुन मिळालेल्या
श्रीमंतीपेक्ष्या, तुमच्या सारखा सोन्याहून
मुल्यवान माणसांचा साठा ज्यांच्याकडे आहे ते खरे श्रीमंत…
गुड मॉर्निंग
…
नारळ आणि माणूस
दर्शनी कितीही चांगले
असले तरीही नारळ
फोडल्या शिवाय आणि
माणूस जोडल्याशिवाय
कळत नाही....
शुभ सकाळ
…
समाधान म्हणजे एक प्रकारचे वैभव असुन,
ते अंतःकरणाची संपत्ती आहे..
ज्याला ही संपत्ती सापडते तो खरा सुखी होतो.
सुप्रभात
…
आज एक नवीन दिवस आहे,
आणि त्याच्याबरोबर नवीन संधी देखील आहे.
प्रत्येक क्षणाचा पुरेपूर फायदा घ्या
आणि तुमची सकाळ चांगली जावो.
शुभ सकाळ
…
“जगातील फक्त मानव एकमेव प्राणी आहे,
ज्याला भगवंताने हसण्याची गुणवत्ता दिली आहे,
गमावू नका. ”
नेहमी आनंदी रहा, हसत रहा, हसवत रहा.''
गुड मॉर्निंग
…
थंडी क्षणांची पण गारवा कायमचा,
ओळख क्षणांची पण आपुलकी कायमची,
भेट क्षणांची पण नाती आयुष्यभराची,
सहवास क्षणांचा पण ओढ कायमची,
हीच खरी नाती मनांची,
सकाळच्या सुंदर शुभेच्छा.
रात्र ओसरली दिवस उजाडला,
तुम्हाला पाहून सूर्य सुद्धा चमकला,
चिलमील किरणांनी झाडे झळकली,
सुप्रभात बोलायला सुंदर सकाळ उगवली.
शुभ प्रभात
…
आनंदाने फुलवुया जीवनाचा,
सुंदर मळा..
सद्विचारांच्या रंगाने रंगवुया,
मनाचा फळा..
शुभ सकाळ
संबंधित बातम्या