Good Morning Wishes In Marathi: वार कुठलाही असो, दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस चांगला जातो. अर्थात, जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखी खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमध्ये तुमच्या प्रियजनांचे प्रेमही दडलेले असते. अंथरुणातून उठण्यापूर्वी आपण किलकिल्या डोळ्यांनी फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर 'हे' मेसेज, कोट्स खास तुमच्यासाठीच आहेत.
धावपळीच्या जगण्यामध्ये,
एक विसावा नक्की द्यावा…
गरम गरम चहा घेऊन,
कामा मध्ये उत्साह आणावा…
मैत्रीच्या जीवनामध्येही,
आठवणीचा गाव यावा..
हृदयात जपलेल्या प्रत्येकाला,
रोज नक्की आवाज द्यावा !
सुख मागून मिळत नाही
शोधून सापडत नाही
अशी गोष्ट आहे
दुसऱ्याला दिल्याशिवाय
स्वतःला मिळत नाही..
शुभ सकाळ
रक्त गट कुठलाही असो…
रक्तात माणुसकी असली पाहिजे..
अशोकाच्या झाडाच्या पानासारखे
गळून फक्त कचरा बनू नका,
तर मेहंदीच्या पानासारखे बना जे
स्व:ताला कुस्करून दुसऱ्याच्या
आयुष्यात रंग भरतात..
शुभ सकाळ
नाती, प्रेम, मैत्री
तर सगळीकडेच असतात,
पण परीपूर्ण तिथेच होतात,
जिथे त्यांना
आदर आणि आपुलकी
मिळते…
शुभ सकाळ
आजचा दिवस कठीण
आहे त्यापेक्षा
उद्याचा दिवस कष्ट प्रद
असेल, पण
त्यानंतरचा दिवस मात्र
तुमच्यासाठी
प्रयत्नांना यश देणारा
असेल.
शुभ सकाळ
जीवन हा एक पाण्याचा
प्रवाह आहे,
समुद्र गाठायचा असेल, तर
खाचखळगे पार करावेच
लागतील
शुभ सकाळ
यशस्वी भरपूर जण असतात,
परंतु समाधानी फार
कमी जण असतात
यश जरी आपल्या कतृत्वाचा
विजय असला, तरी समाधान हा
आपल्या मनाचा
विजय असतो….!!
शुभ सकाळ
मैत्री हे जगातील एकमेव नात
आहे जे रक्ताचं नसलं तरी
खात्रीच असतं…!
शुभ सकाळ
मोह नसावा पैशाचा,
गर्व नसावा सौंदर्याचा,
अहंकार नसावा श्रीमंतीचा,
झोपडी का असेना, घास असावा
समाधानाचा
तरच आनंद मिळेल
जीवनाचा.
आयुष्यात संपत्ती कमी मिळाली
तरी चालेल,
पण मैत्री अशी मिळवा,
की कोणाला त्याची
किंमत पण करता
येणार नाही….
शुभ सकाळ
संबंधित बातम्या