Good Morning Marathi Message: तुमचा प्रत्येक दिवस सुंदर आणि सकारात्मक बनवण्यासाठी आम्ही दररोज असे गुड मॉर्निंगचे सुंदर मराठी संदेश तुमच्यासाठी घेऊन येत असतो. हे संदेश फक्त तुमचाच नव्हे तर तुमच्या नातेवाईकांचा आणि मित्र-मैत्रिणींचा दिवससुद्धा गोड करतील. सकाळी उठल्याबरोबर आपल्या जवळच्या लोकांना हे संदेश पाठवून सकाळी सकाळी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचे उत्तम कार्य तुम्ही करता. आजकाल सोशल मीडियाच्या माध्यमातून हे काम करणे अगदीच सोप्पे झाले आहे. अलीकडे बहुतांश लोक फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांना संदेश पाठवून, स्टेट्स ठेऊन शुभ सकाळ म्हणत आपला दिवस सुखद बनवतात. आज आपण असेच काही सुंदर संदेश पाहणार आहोत.
१) ''विश्वास ठेवा,
आपण जेव्हा कोणासाठी
काही चांगले करत असतो,
तेव्हा आपल्यासाठी सुद्धा,
कुठेतरी काही चांगले घडत असते…''
शुभ सकाळ!
२) ''लहानपासुनच सवय आहे
जे आवडेल ते जपुन ठेवायचं..
मग ती वस्तु असो वा….
तुमच्यासारखी गोडं माणसं.''
सुप्रभात!
३)''आयुष्य खूप सुंदर आहे,
उतुंग भरारी मारा,
ढगा आढ उडणाऱ्या गरूडाला
पण तुमचा हेवा वाटला पाहिजे
इतके मोठे व्हा, आमच्या शुभेच्छा सदैव तुमच्या पाठीशी आहेत''
शुभ सकाळ!
४) ''कोणी कितीही घेरलं तरी
स्वतःचे अस्तित्व
स्वतः निर्माण करता यायला पाहिजे''
गुड मॉर्निंग!
५)''सुंदर दिवसाची सुरुवात,
नाजुक उन्हाची प्रेमळ साद,
मंजुळ वाऱ्याची हळुवार हालचाल,
रोज तुमच्या आयुष्यात येवो सुंदर सकाळ.''
शुभ सकाळ!
६)''कोकिळेच्या मंजुळ सुरांनी,
फुलांच्या हळुवार सुगंधानी आणि
सूर्याच्या कोमल किरणांनी,
हि सकाळ आपल स्वागतं करत आहे''
सुप्रभात
७)''मनातले अबोल संकेत
ज्यांना न बोलता कळतात
त्यांच्याशीच मनांची
खोल नाती जुळतात''
शुभ सकाळ!
८)''जर यशाच्या गावाला जायचेअसेल तर
अपयशाच्या वाटेनेच
प्रवास करावा लागेल.''
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या