Morning Wishes: 'सुंदर सकाळची सुंदर सुरुवात'! जवळच्या मित्रांना द्या 'गुड मॉर्निंग'च्या अशा शुभेच्छा-good morning marathi message these messages will make the day special ,धर्म बातम्या
मराठी बातम्या  /  धर्म  /  Morning Wishes: 'सुंदर सकाळची सुंदर सुरुवात'! जवळच्या मित्रांना द्या 'गुड मॉर्निंग'च्या अशा शुभेच्छा

Morning Wishes: 'सुंदर सकाळची सुंदर सुरुवात'! जवळच्या मित्रांना द्या 'गुड मॉर्निंग'च्या अशा शुभेच्छा

Aug 05, 2024 07:04 AM IST

Good Morning Marathi Message: आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. झोपेतून उठल्याबरोबर आपण अपेक्षेने आपल्या फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो.

Good Morning Marathi Message
Good Morning Marathi Message

Good Morning Marathi Message: आठवड्यातील कोणताही वार असो जर त्या दिवसाची सुरुवात एखाद्या खास संदेशाने झाली तर, संपूर्ण दिवस खास बनतो. आणि जर हा मेसेज तुमच्या प्रिय व्यक्तींनी तुम्हाला पाठवला असेल, तर तो आणखीच खास असतो. आपल्या जवळच्या व्यक्तींनी पाठवलेल्या मेसेजमुळे तुम्हाला एक सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. झोपेतून उठल्याबरोबर आपण अपेक्षेने आपल्या फोनकडे पाहतो आणि तेव्हा आपल्याला आलेला हा मेसेज दिवसाची सुरुवात आनंदाने करून देतो. एखादा सुंदर संदेश तुमच्या चेहऱ्यावर मधासारखं गोड हास्य आणू शकतो. जर, तुम्हालाही आपल्या प्रियाजनांना मेसेज पाठवायचे असतील, तर ‘हे’ मराठी मेसेज तुम्हाला उपयोगी येतील.

'शुभ सकाळ'चे सुंदर मराठी संदेश

''सुंदरता नसली तरी चालेल!

सोज्वळता असली पाहीजे!!

सुगंध नसला तरी चालेल!

दरवळ असायला पाहिजे!!

नातं नसलं तरी चालेल!

आपुलकीचे बंधन असायला पाहिजे!!

भेट होत नसली तरी चालेल!

स्नेहमय गोड संवाद असला पाहिजे!!''

शुभ सकाळ!

 

''इंद्रधनुष्य आणि माणूस या दोघांमध्ये एक साम्य आहे.

दोघांमध्ये विविध प्रकारचे रंग असतात.

फरक एवढाच की,

इंद्रधनुष्याचे रंग डोळ्याने आणि माणसांचे रंग अनुभवाने पाहता येतात.''

शुभ सकाळ!

 

''दवाचे थेंब फुलांना भिजवत आहेत,

थंड वारे ताजेपणा जागृत करत आहेत,

ये आणि या अनुभवात सामील हो,

एक सुंदर सकाळ तुझं स्वागत करत आहे!''

शुभ सकाळ!

''सकाळी मनात राग धरू नका,

यामुळे मेंदूचा एक भाग व्यस्त राहतो!

सकाळची सुरुवात आनंदाने करा,

दिवस आनंदमय होऊन जातो!''

शुभ प्रभात!

 

''ओसाड माळरानावर जेव्हा गुलमोहर फुलतो,

तेव्हा त्याला बघून कळत की,

बहरण्यासाठी परिस्थिती नाही मनस्थिती भक्कम असावी लागते.''

शुभ सकाळ!

 

''वाणी म्हणजे आनंद

वाणी दु:खाचे कारण

वाणी म्हणजे वेदना

आणि वाणी म्हणजेच मलम!''

शुभ सकाळ!

 

''आशा ही जीवनाची शक्ती आहे,

विश्वास ही यशाची चावी आहे.

आजचा दिवस आशावादी राहून,

विश्वासाने भरून घ्यावा.''

शुभ सकाळ!

 

''उदयाच्या कांतीने जग झगमगले,

निसर्गाच्या सौंदर्याने मन प्रफुल्लित झाले.

आजचा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवा,

मन शांत करून नवीन जोशाने कामाला लागा!''

शुभ सकाळ!

 

''प्रत्येकाच्या मनात जागा करणे गरजेचे नसते..

काहींच्या डोळ्यात खुपण्यात सुद्धा वेगळीच मजा असते..!!''

सुप्रभात!

“माझ्यामुळे तुम्ही नाही ” तर “तुमच्यामुळे मी आहे”

ही वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात

आपलं जगणं दुसऱ्यासाठी जेवणातल्या मिठासारखं असावं

पाहिलं तर दिसत नाही, पण नसलं तर जेवणच जात नाही.''

शुभ सकाळ!

 

 

विभाग