Good Morning Marathi Message: एखाद्याचा दिवस खास बनवल्याने तुमचा दिवस आपोआप खास बनतो. अशा वेळी जर तुम्ही सकाळी लवकर तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना चांगले मेसेज पाठवले तर त्यांच्यासोबत तुम्हालाही आनंद मिळतो. आपल्या चांगल्या विचारांसह सकाळच्या शुभेच्छा पाठवून, इतर व्यक्तीचा दिवस देखील चांगला जाईल, असा प्रयत्न नक्की करा. तुम्हालाही तुमच्या प्रियजनांच्या दिवसाची सुरुवात सुंदर करायची असेल, तर आम्ही तुमच्यासाठी काही सुंदर संदेश घेऊन आलो आहोत, जे तुम्ही तुमच्या नातेवाईकांना पाठवू शकता.
धुक्याने एक छान गोष्ट शिकण्यासारखी असते
जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल…''
वेळ ही एखाद्या वाहत्या नदीसारखी असते,
एकदा स्पर्श केलेल्या पाण्याला,
तुम्ही पुन्हा स्पर्श करू शकत नाही,
कारण नदीच्या प्रवाहाबरोबर गेलेले पाणी,
कधीही परत येत नाही, असेच वेळेचेही आहे,
एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नाही,
म्हणून आयुष्यातील प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या.
सुप्रभात!
आयुष्य खूप लहान आहे,
प्रेमाने गोड बोलत रहा,
धन-दौलत कोण कोणाला देत नसतं,
फक्त माणुसकी जपत रहा,
प्रसंग कोणताही असो सुखाचा की दुःखाचा,
मी प्रेमाने साथ देईन, तुम्ही फक्त हाक द्या!
शुभ सकाळ
कोणतही फुल कधीच दुसऱ्या फुलांशी स्पर्धा करत नाही,
कारण त्यांना पण माहीत असतं की निसर्गाने,
प्रत्येकालाच वेगळं बनवलयं, प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिलयं,
पाण्यापेक्षा तहान किती आहे, याला जास्त किंमत असते.
मृत्यू पेक्षा श्वासाला जास्त किंमत असते,
या जगात नाते तर सर्वच जोडतात.
पण नात्यापेक्षा विश्वासाला जास्त किंमत असते.
शुभ सकाळ
आपण जे देतो ते आपल्याकडे
परत येतं त्यामुळे चांगलं द्या,
चांगलच मिळेल.
शुभ सकाळ.
सिंह बनून जन्माला आलो तरी,
स्वतःचे राज्य हे स्वतःच
मिळवावे लागते, कारण या जगात
नुसत्या डरकाळीला महत्त्व नाही.
शुभ सकाळ!
साखरेची गोडी सेकंदच राहते,
पण माणसाच्या स्वभावातील गोडी मात्र
शेवटपर्यंत मनात घर करून जाते.
निर्मळ मनाने बनवलेली नाती
कधीच धोका देत नाही,
म्हणून नात्यांमध्ये प्रेम निर्माण करा
नाती कधीच तुटत नाही.
शुभ सकाळ
यशस्वी व्हायचं असेल तर,
सुरुवात एकट्यानेच करावी लागते.
जेव्हा तुम्ही जिंकू लागता,
तेव्हा लोक आपोआप तुमच्या मागे येतात.
शुभ सकाळ!
संबंधित बातम्या